Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी bhuvan bam : सुप्रसिद्ध युट्यूबर भुवन बमवर शोककळा, कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू

bhuvan bam : सुप्रसिद्ध युट्यूबर भुवन बमवर शोककळा, कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू

माझी आई आणि बाबा आता माझ्या जवळ नाही आहेत. आता जगण्याला पुन्हा सुरुवात करावी लागणार

Related Story

- Advertisement -

नेहमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांचे आणि तरुणांचे निखळ मनोरंजन करणारा सुप्रसिद्ध युट्यूबर भुवन बमवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनाचा फटका भुवन बमच्या परिवाराला बसला आहे. भुवनने कोरोनाने त्याच्या ह्रदयाच्या सर्वात जवळ असलेल्या व्यक्तींना हिरावून घेतले आहे. भुवन बम याने इंस्टाग्रामवर आपल्या आई-वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. भुवनने भावूक पोस्ट लिहित आई-वडिलांच्या आठवण सांगितली आहे. भुवनच्या पोस्ट नंतर राज्यात आणि बॉलिवूडमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री तसेच चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये भुवनला कोरोनाची लागण झाली होती. त्याने स्वतःला घरीच क्वारंटाईन करुन घेतले होते तसेच उपचारही घरातच करण्यात येत होते. भुवन बमच्या आई-वडिलांनाही काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांच्या आई आणि वडिलांना काही वर्षांपासून दीर्घकालीन आजार असून त्यावर उपचार सुरु होते. आई आणि वडिल यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भुवन त्यांची काळजी घेत होता परंतु कोरोनामुळे आई- वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे भुवनला धक्का बसला आहे.

- Advertisement -

भूवनने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी माझ्या दोन्ही लाइफलाइन कोरोनामुळे गमावल्या आहे. माझी आई आणि बाबा आता माझ्या जवळ नाही आहेत. आता जगण्याला पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे. मन तयार होत नाही. मी चांगला मुलगा ठरलो का? त्यांना वाचवण्यासाठी मी कमी तर नाही पडलो ना? अशा प्रश्नांसोबत मला राहावं लागणार आहे. पुन्हा ते माझ्यासोबत येऊ शकतील का? अशी आशा आणि प्रार्थना करतो अशी भावनिक पोस्ट भुवनने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhuvan Bam (@bhuvan.bam22)

- Advertisement -

अवघ्या महिन्याभरात भुवनच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. ११ मे २०२१ रोजी भुवनच्या वडिलांचा तर १० जून २०२१ रोजी भुवनच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर भुवनने सोशल मीडियावर आपले दुःख शेअर केलं आहे. भुवनचे बॉलिवूडमधील मित्रपरिवाराने दुःखात सहभागी झाले आहेत. आशीष चंचलानी,कैरी मिनाटी, मुकेश छाबडा,राजकुमार राव, ताहिर कश्यप यांनी सोशल मीडियावर भुवनच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटलं आहे. भुवन बमचे युट्यूबवर बीबी की वाइन्स नावाचे चॅनल आहे. या चॅनलवर भुवन कॉमेडी वीडिओ शेअर करत असतो.

- Advertisement -