पत्नीला 7 दिवस उपाशी ठेवलं; अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीविरोधात तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईने त्याची पत्नी आलिया सिद्दीकी विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता त्याच्या पत्नीने नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप केले आहेत. आलियाच्या वकीलांनी सांगितले की, “नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी आलिया सिद्दीकीला घरातून बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न केले. सर्वात आधी त्यांनी आलियाविरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांच्या माध्यामतून अटक करण्याची धमकी दिली.”

आलियाचे वकील म्हणाले की, “नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबीयांनी मागील सात दिवसांपासून माझ्या अशिलाला जेवण दिलेले नाही. शिवाय झोपण्यासाठी अंथरुन देखील दिलेले नाही आणि अंघोळीसाठी बाथरुममध्ये जाऊ देत नाहीत. इतकंच नव्हे तर त्यांच्या रुम बाहेर सीसीटीव्ही देखील लावले असून रुम बाहेर 24 तास बॉडीगार्ड तैनात करण्यात आले आहेत.”

नवाजुद्दीन सिद्दीकी विरोधात तक्रार दाखल
आलियाचे वकील म्हणाले की, “या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त मी आलिया सिद्दीकी यांच्याशी संपर्क करु नये म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु मी आणि माझ्या टीमने अथक प्रयत्न करुन त्यांची सही घेतली. त्यामुळे आता आम्ही नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल करु शकतो” असं आलियाचे वकील म्हणाले.


हेही वाचा :

‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटासाठी वडील मुलाची जोडी एकत्र