Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स तारायंत्राचे जनक सॅम्युएल मोर्स

तारायंत्राचे जनक सॅम्युएल मोर्स

Related Story

- Advertisement -

सॅम्युएल फिन्ली ब्रीझ मोर्स हे अमेरिकन चित्रकार व विद्युत चुंबकीय तारायंत्राचे जनक. मोर्स यांचा जन्म 2७ एप्रिल १७७१ रोजी चार्ल्सटाऊन (मॅसॅचूसेट्स) येथे झाला. त्यांचे शिक्षण अँडोव्हर येथील फिलिप्स अकॅडमीत व पुढे येल कॉलेज येथे झाले. विद्यार्थीदशेतच त्या काळी फारसे आकलन न झालेल्या विद्युत या विषयावरील व्याख्यानामुळे त्यांना गोडी निर्माण झाली. त्याच वेळी त्यांना लघू व्यक्तिचित्रे काढण्याचा छंद जडला. तथापि त्यांच्या वडिलांना त्यांचा हा छंद पसंत नव्हता.

१८१० मध्ये पदवी संपादन केल्यावर त्यांनी बॉस्टन येथील एका ग्रंथ प्रकाशकाकडे कारकुनाची नोकरी पत्करली. त्या काळचे प्रख्यात अमेरिकन चित्रकार वॉशिंग्टन ऑल्स्टन व गिल्बर्ट स्टूअर्ट यांनी मोर्स यांच्या चित्रकलेच्या व्यासंगाला प्रोत्साहन दिले. १८११ साली ऑल्स्टन यांचे विद्यार्थी म्हणून ते इंग्लंडला चित्रकलेच्या अभ्यासासाठी गेले. तेथील चित्रकलेच्या वैशिष्ठ्यपूर्ण ‘ऐतिहासिक’ शैलीचा त्यांनी स्वीकार केला. तथापि १८१५ मध्ये ते अमेरिकेला परतले तेव्हा अमेरिकन लोकांना त्यांच्या ऐतिहासिक चित्रांत रस नाही, असे त्यांना दिसून आले आणि त्यामुळे नाईलाजाने त्यांना अर्थार्जनासाठी व्यक्तिचित्रे रंगविण्याचा व्यवसाय पुन्हा पत्करावा लागला. त्यांनी न्यू इंग्लंड, न्यूयॉर्क व द. कॅरोलायना या राज्यांत फिरस्ता चित्रकार म्हणून सुरुवात केली.

- Advertisement -

१८१७ मध्ये त्यांनी आपले धाकटे बंधू सिडनी एडवर्ड्स मोर्स यांच्या समवेत पंपासंबंधीची तीन एकस्वे (पेटंट) मिळविली होती. संगमरवरावर कोरीव काम करण्याचे एक यंत्र त्यांनी १८२३ मध्ये विकसित केले. १८२२ नंतर विद्युत विषयक प्रयोगांत त्यांनी सातत्याने विशेष रस घेतला. १८३२ मध्ये फ्रान्सहून जहाजातून परत येतानाच्या प्रवासात चार्लस टी. जॅक्सन यांनी मोर्स यांना लांब अंतरावर विद्युत् प्रेषण करणारे व फ्रान्समध्ये मिळवलेले एक उपकरण दाखविले. यामुळे मोर्स यांना विद्युत व तारायंत्र या विषयांत अधिक स्वारस्य निर्माण झाले. पुढील तीन वर्षे त्यांनी अनेक प्रयोग करून १८३५ मध्ये पहिले विद्युत चुंबकीय तारायंत्र उपकरण तयार केले. यात एक विद्युत मंडल चालू व बंद करून संकेत प्रेषण करणारा प्रेषक, संकेतांची नोंद करणारा विद्युत् चुंबकीय ग्राही आणि संकेतांचे अक्षरे व संख्या यात रूपांतर करणारी सांकेतिक लिपी यांचा समावेश होता. त्यांनी योजलेली ठिपके (डॉट्स) व प्रास (डॅशेस) यांवर आधारलेली सांकेतिक लिपी अद्यापही त्यांच्या नावाने ओळखली जाते.

पुढे त्यांनी अधिक लांब अंतरावर संदेश पाठविण्यासाठी विद्युत् चुंबकीय अभिचालित्रांच्या प्रणालीचा शोध लावला. त्यांच्या शोधाच्या विकासात त्यांना एल डी. गेल व जोझेफ हेन्री यांचे तांत्रिक साहाय्य आणि अल्फ्रेड व्हेल यांचे आर्थिक साहाय्य लाभले. मोर्स यांनी १८३७ मध्ये आपल्या शोधाच्या एकस्वाकरिता अर्ज केला, पण त्यांना आपल्या शोधाला मान्यता मिळण्यास जवळजवळ सात वर्षे वाट पहावी लागली. शेवटी १८४३ मध्ये अमेरिकेच्या काँग्रेसने वॉशिंग्टन ते बाल्टिमोर यांच्या दरम्यान तारयंत्राद्वारे प्रायोगिक संदेशवहन प्रस्थापित करण्यासाठी ३०,००० डॉलरचे अनुदान मंजूर केले आणि २४ मे १८४४ रोजी या योजनेद्वारे पहिला संदेश प्रेषित करण्यात आला. अशा या महान संशोधकाचे 2 एप्रिल 1872 रोजी निधन झाले.

- Advertisement -