Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स बाई, बुब्स, ब्रा ते... 'ब्रा'लेस चळवळ

बाई, बुब्स, ब्रा ते… ‘ब्रा’लेस चळवळ

हेमांगीच्या 'ब्रा'लेस असल्याच्या चर्चाच जास्त गरम झाल्या आहेत

Related Story

- Advertisement -

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हीच्या पोळ्या लाटतानाच्या व्हिडीओने सध्या सर्वत्र खळबळ उडवली आहे. पण ज्या उद्देश्याने तिने हा व्हिडीओ काढला होता. त्या पोळीच्या गोल आकारापेक्षा हेमांगीच्या ‘ब्रा’लेस असल्याच्या चर्चाच जास्त गरम झाल्या आहेत. त्यातही तिला तिच्या ब्रालेस असण्यावर पुरुषांपेक्षा महिलांनीच जास्त हरकत घेतली आहे. अशा थिल्लर लोकांचा हेमांगीने चांगलाच समाचार घेतला आहे. यामुळे अनेकांनी हेमांगीचे समर्थन करत तिच्या परखड मतांच स्वागत केलं आहे. तर दुसरीकडे ‘बाईमाणसाने काय घालायचं आणि काय नाय घालायचं’ याच स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला आहे. अशी चळवळच सोशल मीडियावर हेमांगीच्या ब्रा न घातल्याने सुरू झाली आहे. पण खरी मेख येथेच आहे. स्त्रीच्या ब्रालेस असण्याचा किंवा तिच्या कपड्यांचा संबंध थेट तिच्या चारित्र्याशी जोडणाऱ्यांना या चळवळीतून उत्तर दिलं जात आहे.

पण हेमांगीच्या बाई, बुब्स, ब्रा यावरून सुरू झालेलं स्त्रीवादाचं हे काही पहीलंच प्रकरण नाही. तर ‘द न्यूयॉर्कर’या अमेरिकन साप्ताहीकामध्ये २६ ऑक्टोबर २०१७ साली ‘हिलरी ब्रेनहाऊस’ या लेखिकेचा एक लेख प्रसि्दध झाला होता. ‘द जॉय ऑफ नॉट वेअरींग अ ब्रा.’या मथळ्याखाली लिहण्यात आलेल्या या लेखात हिलरीने तिला ब्रा घालण का आवडतं नाही यावर आपलं मत मांडल होतं. पण त्याची फार चर्चा झाली नाही.

- Advertisement -

मात्र त्यानंतर २०१९ साली दक्षिण कोरियन अभिनेत्री व सिंगर सुली हीनं देखील एका लाईव्ह कार्यक्रमात ब्रा न घालताच एन्ट्री करत खळबळ उडवली होती. त्यानंतर तिने ब्रा न घातलेले अनेक फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत # no bra moment सुरू केली. अनेक सार्वजनिक ठिकाणी सुली ब्रा न घालता फिरत होती. सुलीच्या या बिनधास्तपणाचे समर्थन करण्यासाठी आणि # no bra momentला पाठींबा देण्यासाठी अनेक दक्षिण कोरियन महिला ब्रा न घालता रस्त्यावर उतरल्या होत्या. दक्षिण कोरियन संस्कृतित स्त्रियांचे असं मोकळ -ढाकळं फिरणे तेथील अनेक महिलांनाच रुचलं नाही. त्यावरून सुलीवर महिलांनीच सर्वाधिक टीका केली होती. तर जर महिला ब्रा न घालताच वावरू लागल्या तर त्यांचे हलणारे स्तन बघून पुरूष उत्तेजित होतील व बलात्काराच्या घटना वाढतील अशा भयंकर प्रतिक्रीया त्यावेळी जनमाणसातून व्यक्त झाल्या. पण त्यामुळे सुलीच्या समर्थक महिलांचा आकडा वाढला. त्यानंतर सुलीच्या फॉलोअर्समध्ये अचानक वाढ झाली. तिच्या लाईव्ह कॉन्सर्टची गर्दीही वाढली. तिथेही सुलीच्या # no bra moment चा संबंध स्त्री स्वातंत्र्याशी जोडला गेला. ब्रा म्हणजे बंधन आणि ब्रालेस म्हणजे एखाद्या रुढी , परंपरेच्या जोखडातून स्वत:ची मुक्तता करणं. असाच सूर दक्षिण कोरियात उमटला.

त्यानंतर म्हणजे २०२० साली जगभरात कोरोना महामारीने हाहाकार उडवला. लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम सुरू झाले. यादरम्यान, महिलाही वर्क फ्रॉम होम करत होत्या. ऑफिसच काम आणि घरच काम हातोहात करावं लागतं असल्याने जगभरातील महिला वैतागल्या होत्या. तशातच ऑफिसला जाताना टापटीप व नीट नेटकं राहणं गरजेच असतं. पण वर्क फ्रॉम होम करताना पेहरावाची फिकीर नसते. कारण तिथे तुम्हांला कंपनीतलं कोणी बघणार नसतं. यामुळे आधीच घरकाम व ऑफिसकाम करून त्रस्त असलेल्या महिलांनी ज्यामुळे बंधनात असल्याचा फिल येतो ती ब्रा घालण्याचंच सोडून दिल्याचं सोशल मिडियावर पोस्ट केलं. त्यानंतर एकामागोमाग एक अशा लाखो महिलांनी त्यास दुजोरा दिला. विशेष म्हणजे यादरम्यान, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये दुकान जरी बंद असली तरी ऑनलाईन शॉपिंग साईट सुरू होत्या. यावेळी इतर कपड्यांच्या खरेदीच्या तुलनेत ब्रा खरेदी करण्याचा महिलांचा कल त्याकाळात अल्प असल्याचे काही ऑनलाईन शॉपिंग साईट चालवणाऱ्या मालकांनी सांगितलं.

- Advertisement -

त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या कमी होताच. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरासह इतर शहरांमध्ये ऑफिसेस सुरू करण्यात आली. त्यावेळीही ब्रालेसच ऑफिसमध्ये जात असल्याचे सांगत अनेक महिलांनीच सोशल मिडियावर आपले अनुभव शेअर केले. यास अनेक महिला हॉलीवूड स्टार्सनेही पाठींबा देत. लॉकडाऊनमध्ये ब्रा वापरली नसल्याचं व यापुढेही वापरणार नसल्याचं टि्वट करत. महिलांच्या अघोषित braless चळवळीचं समर्थन केलं. ज्यामुळे श्वास गुदमरतो अशा बंधनातून स्वत:ला मोकळे करा असा अप्रत्यक्ष सल्लाच braless चळवळीतून महिला एकमेकांना देत होत्या.

त्यानंतर मिडियानेही ऑफिसला जाताना bralessजाण किती योग्य यावर डिबेट कार्यक्रम घेतले. त्यावेळी एका महिला होस्टने braless चळवळीचे समर्थन करताना लाईव्ह शोमध्ये ब्रा काढत ती हवेत फेकून दिली. तिच्या या बोल्ड अॅक्शनने पुरुष होस्टची बोलती बंद केली. जणू नको असलेल्या बंधनातून स्वत:ला मुक्त केल्याचा तिचा अविर्भाव होता. कोरोना काळातील या शो ने जगभरात धूम उडवली. तसंच महिलांवरील अनेक बंधनापैकी ब्रा हे देखील एक बंधन असल्याचा संदेश महिला ब्रालेस होत देऊ लागल्या. न्यूयॉर्क नंतर braless चे हे लोण फ्रान्समध्ये पोहचले. तेथेही महिलांनी ऑफिसमध्ये braless जाण्यास सुरुवात केली.

पण भारतासारख्या देशात आतापर्यंत तरी महिलांनी braless असण्याबद्दल उघडपणे बोलणं टाळलं आहे. कारण आहे आपली पुरुषप्रधान संस्कृती व विचारसरणी. यात स्त्रियांच्या अंतर्वस्त्र म्हणजे सेक्सी टॉक. त्यावर बोलणं म्हणजे महापाप. त्यातही जर कोणी बोललं तर तो किंवा ती कशी नालायक, चालू आहे. याचीच चर्चा रंगते. यामुळे हेमांगीचं बाई, बुब्स, ब्रा वर लोकांचा समाचार घेणं स्वाभाविक आहे. शेवटी तिने काय घालायचं आणि काय नाय ते ठरवण्याचं स्वातंत्र्य या देशातील प्रत्येक महिलेला आहे. तो तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. पण त्यावर आचरट टिप्पणी करून आपल्या हीन बु्ध्दीचे प्रदर्शन करणारी मानसिकता या देशात केव्हा बदलणार हाच मोठा प्रश्न आहे.

 

 

- Advertisement -