घरफिचर्सचुका-विरहित गुंतवणूक करुयात !

चुका-विरहित गुंतवणूक करुयात !

Subscribe

‘चुकतो तो माणूस !’ काम करणार्‍या माणसाच्या चुका होणारच !! अशी वाक्ये आपण कधीही आणि कोठेही ऐकत असतो आणि वेळ पडली की आपणही असा ‘डायलॉग’ फेकत असतो. कारण दुसर्‍यांच्या चुकांबद्दल बोलायला कोणालाही आवडतेच. आयुष्यात अनेक चुका आपल्या हातून कळत-नकळतपणे होत असतात. परंतु ‘काही चुका’ आपल्याला खूप महागात पडतात. व्यक्तिगत आयुष्यातील काही बाबतीत आणि आर्थिक ‘चुका’ या ‘महाचुका’ ठरू शकतात आणि त्याचा मोठा फटका असू शकतो. काही कॉमन चुका आपण पाहूयात आणि कशा रितीने त्या टाळता येतील ते देखील पाहूयात.
आर्थिक किंवा गुंतवणूकबाबतीतील चुका – या चुका नेमक्या कशाप्रकारच्या असतात ते पाहणार आहोत. तसे वर्गीकरण करुयात.

1. चुकीच्या निर्णयामुळे झालेली चूक/चुका – आपण पैसे गुंतवताना मुळातच आपला निर्णय चुकतो आणि परिणाम भोगावा लागतो.

- Advertisement -

उदाहरणार्थ- एखाद्या स्कीममध्ये पैसे गुंतवले आणि पुढे कळले की ती स्कीम नफा मिळवत नाही. तेव्हा जाणवते की आपला निर्णय चुकला. कधी अमुक कंपनीचा शेअर स्वस्त मिळतो म्हणून घेतो आणि नंतर त्याचा भाव पडतो. कंपनीची कामगिरी निष्प्रभ ठरते. शेअर विकायला गेलो तर खरेदीची किंमतही येत नाही. तसेच कोणाच्या सांगण्यावरून पैसे गुंतवतो आणि मग डोक्याला हात लावायची पाळी येते.

2. पैसे दुप्पट करण्याचा मोह – अनेकदा अशा स्कीम्स येतात आणि सुशिक्षित मंडळीही मोहात पडतात. अधिक व्याज आणि पैसे दुप्पट -तिप्पट करून देणारे भेटतात !! आणि अचानकपणे जाणवते स्कीमवाले बोगस निघाले आणि लाखो-कोटींचा गंडा घालून गायब झाले आहेत. कोणी कितीही सांगितले तरी अशा मृगजळाच्या मागे धावू नका!

- Advertisement -

3. एकाच ठिकाणी पैसे ठेवण्याची घोडचूक – खूप लोक अशी चूक करतात आणि भरभक्कम कमाई करण्याच्या नादात सर्वच गमावण्याची आणि पश्चाताप करण्याची वेळ येते. इंग्रजीत एक मोलाची म्हण आहे की कोणीही सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत. कारण टोपली पडली की सगळी अंडी फुटण्याचा धोका असतो. हेच तत्व आर्थिक बाबतीत लागू पडते. सोयीचे पडते. व्याज जास्त अशा काही मुद्यांवरून आपण एकाच ठिकाणी पैसे ठेवले आणि काही गडबड-घोटाळा झाला तर एकाच फटक्यात सर्वच गुंतवणूक डुबण्याची वेळ येते. आपले पूर्वजदेखील पूर्वीच्या काळी आपला पैसा-अडका, दाग-दागिने फडताळात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी डबे-बरण्या ह्यात ठेवायचे. पैसे एकत्र-एकाच जागी न ठेवणे हे केव्हाही व्यवहार्य असते.
अ) आपल्या जवळ असलेल्या सहकारी किंवा खाजगी बँकेत पैसे ठेवणे किंवा एखाद्या पतपेढीत ठेवणे.
ब) ऑफिसातील सोसायटी किंवा एखादी व्यक्ती अधिक व्याज देतात म्हणून सर्व मुद्दल जमा करणे

4. डोळेझाक गुंतवणूक – आपण पैसे गुंतवतो आणि पुढे काय होते? हे कधी ढुंकूनही पहात नाही. ह्यात अति-बिझी असणे, फाजील आत्मविश्वास किंवा ढिसाळपणा अशी कारणे आपल्या नुकसानीस कारणीभूत होऊ शकतात. म्हणून कोणतीही गुंतवणूक केल्यावर त्याबद्दल नियमितपणे चौकशी करणे, माहिती घेत रहाणे जरुरीचे असते. पाच वर्षांनी बघू! अशी भूमिका अयोग्य आहे. असे दुर्लक्ष महागात पडू शकते.

उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले की भाव काय? कसे चढ-उतार होतात हे सातत्याने पाहणे गरजेचे असते. कुठेतरी आपण तीन किंवा पाच वर्षे मुदतीसाठी पैसे ठेवतो आणि विसरूनही जातो. मधल्या काळात व्याजदर कमी होणे. बँक-सोसायटीमध्ये काही अडचण वा गोंधळ होणे. सरकारी धोरण बदलणे किंवा त्याचा आपल्या ठेवीवर परिणाम होणे. कराबाबत नवीन काही सुरू होणे अशा अनेक शक्यता असतात. सतत माहिती घेत राहिलो तरच आपल्याला वेळीच माहिती कळते आणि आपण काही तजवीज वा बदल करू शकतो.

5. स्कीम बदलण्याची/विकण्याची घाई – अनेकदा एखादी स्कीम बंडल निघते. अपेक्षेनुसार कामगिरी करत नाही. तेव्हा आपल्याला कोणीतरी सांगते किंवा सल्ला मिळतो की बाहेर पडा. मग आपल्याला चैन पडत नाही. कधी एकदा विकून मोकळा होतो. अशी तीव्र भावना निर्माण होते. हीच बाब शेअर्सबाबत होऊ शकते. असे काही झाले तर उतावळेपणाला थोडा ब्रेक लावा. काही काळ जावूद्यात आणि मग निर्णय घ्या!! बघा काही वेळ गेल्याने परिस्थितीत किंवा किमतीत सुधारणा होते की नाही.

उदाहरणे – 1) म्युचुअल फंड तितके चांगले कामगिरी करीत नाहीत म्हणून तिथले पैसे काढून पुन्हा बँकेच्या ठेवीमध्ये ठेवणे.
2)अमुक फंडातून काढून घेणे आणि बँकेत ठेवणे किंवा खर्च करणे
3) शेअरबाजार पडला म्हणून काही शेअर्स विकणे
6) फक्त डिव्हिडंड ऊर्ळींळवशपव कमावण्यासाठी म्युचुअल फंडात खरेदी करणे – अमुक म्युचुअल फंडात अधिक लाभांश मिळणार असे गुपित कळल्याने त्याचे काही युनिट्स घेणे टाळावे. कारण केवळ लाभांश हा निकष नसावा. शिवाय त्यावर कर भरावा लागतो. तोच म्युचुअल फंड पुढेही तितकाच डिव्हिडंड देवू शकेल ? असे काही ठोसपणे सांगता येणार नाही.
7) एसआयपीडखझ कधीच म्हणजेच नेव्हर एव्हर बंद करू नका ! –

1- उत्पन्न कमी झाले म्हणून – कधी आपली आवक कमी होते. अडचणी येतात किंवा आर्थिक कोंडी होते म्हणून आपण टिपिकलपणे आपले खर्च आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु करतो. चालू असलेले एस.आय.पी.सहसा बंद करू नका.
2 एसआयपी परतावा कमी झाला म्हणून – कधी कधी अशी वेळ येते की एसआयपी परतावा कमी होऊ लागतो. अशावेळी घाबरून बंद करण्याचा निर्णय हा आततायीपणाचा ठरू शकेल. उलट मार्केट पडले-निर्देशांक घसरला म्हणून अधिक युनिट्स खरेदी करण्याचा व्यवहारिक निर्णय घ्या! कारण शेअरबाजार म्हटला की सतत चढ-उतार होत असतात. म्हणून हबकून किंवा हुरळून न जाता चतुरपणे निर्णय घ्या. झटपट कमाई करण्याचा क्षणिक मोह टाळा आणि दीर्घकालीन ध्येय लक्षात ठेवून गुंतवणूक करत रहा.

उत्तम गुंतवणूक करण्यासाठी आपण सर्वांनी नेहमीच्या चुका म्हणजेच उेाोप चळीींरज्ञशी साठी उेाोप डशपीश वापरूया !!! आणि चुका-विरहित गुंतवणूक करून आपले वर्तमान आणि भविष्य ‘आर्थिक – सुरक्षित’ ठेवूया !!

राजीव जोशी
(लेखक अर्थ आणि बँकिंग अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -