घरफिचर्स पार्श्वसंगीताच्या दुनियेत  

 पार्श्वसंगीताच्या दुनियेत  

Subscribe

अलीकडे बऱ्याचदा एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याच्या इतर अंगांसोबतच त्यातील पार्श्वसंगीताचीही तितकीच चर्चा होत असते. मग बऱ्याचशा समीक्षणात त्यातील पार्श्वसंगीताच्या ‘मॅनिप्युलेटिव्ह’ असण्याचा उल्लेख केला जातो. मात्र त्याचा केवळ ओघवता उल्लेख करण्याऐवजी सदर चित्रपटांतील पार्श्वसंगीत ‘तसे’ का आहे, याचा अधिक विस्तृत स्वरूपात विचार आणि विवेचन करणे गरजेचे आहे...  

तार्किक अंगाने विचार करणारी कुठलीही व्यक्ती एक गोष्ट नक्कीच मान्य करेल की बरेचसे कमर्शियल चित्रपट हे एखाद्या लोकप्रिय गोष्टीचे महत्त्व जाणून तिची लोकप्रियता कॅश-इन करण्याचे एक उत्तम माध्यम आहेत. त्यामुळे भारतातील बहुतांशी प्रेक्षकांची मानसिकता लक्षात घेऊन एखादी गोष्ट शक्य तितक्या सहजतेने आणि मुख्य म्हणजे भाबडेपणाने पडद्यावर कशी आणता येईल याकडे त्याच्या निर्मात्यांचा कल असतो. ज्यामध्ये त्याचे नायक ते सहाय्यक पात्रांचे चित्रण प्रेक्षकांना भावनिक पातळीवर आवाहन केले जाईल अशा प्रकारचे असते. नेमकी हीच गोष्ट त्यातल्या पार्श्वसंगीताबद्दल लागू पडते.

ते कसे तर भारतात कितीही म्हटले आणि खिल्ली उडवली तरी एकता कपूर आणि टेलिव्हिजन निर्मिती क्षेत्रातील इतर निर्मात्यांच्या मालिका पाहणारा एक मोठा वर्ग अस्तित्त्वात आहे. नेमका हाच भारतातील मेनस्ट्रीम चित्रपटांचा मुख्य प्रेक्षकवर्ग आहे. मुद्दा असा की जेव्हा कुठल्याही बाबीचा एकत्रित विचार केला जातो तेव्हा हा प्रेक्षकवर्गही तितकाच महत्त्वाचा ठरतो. गेल्या अनेक वर्षांच्या काळात टेलिव्हिजन मालिकांनी अपवाद वगळता ‘इमोशनल मॅनिप्युलेशन’ करत, प्रेक्षकांच्या भावनिक विकासावर अप्रत्यक्ष आणि सुप्तपणे परिणाम करण्याचे काम केले आहे.

- Advertisement -

अधिक विस्तृतपणे बोलायचे झाल्यास सदर मालिकांनी सुप्तपणे प्रेक्षकांचे ‘ट्रिगर पॉइंट्स’ निर्माण केलेत. ज्यामुळे या ‘मास ऑडिएन्स’ला एखादे दृश्य कुठल्याही बाह्य हस्तक्षेपाखेरीज, इथे पार्श्वसंगीताच्या हस्तक्षेपाखेरीज पाहणे तितकेसे आकर्षक किंवा रंजक वाटत नाही. ज्यामुळे दोन पात्र खऱ्या आयुष्यात बोलतील असा संवाद करत आहेत, ज्याला पार्श्वसंगीताची जोड नाही अशी दृश्ये या प्रेक्षकांना खिळवून ठेवत नाहीत किंबहुना त्यात ती अपयशी ठरतात.  थोडक्यात, आपल्याकडे प्रेक्षकांना प्रत्येक घास भरवून देण्याची सवय लागली (किंबहुना लावली) असल्याने अमुक सीन भावनाप्रधान आहे, किंवा तमुक सीन विनोदी आहे यासाठी जोड म्हणून एखाद्या ठराविक आणि ‘क्लिशे’ संगीताची जोड देणे मालिका आणि चित्रपट निर्मात्यांना आवश्यक वाटते. ज्या चक्राची सुरुवात खरंतर त्यांनीच केलीय!

यासाठी बॉलिवुडच्या मुख्य धारेतील चित्रपटांइतकेच प्रसिद्ध आणि समांतर उदाहरण म्हणून ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या हिंदी मालिकेचे देता येईल. या महिन्यात स्ट्रीमींगची तब्बल दहा वर्षे आणि काही एक हजार भाग पूर्ण करणारी ही मालिका संगीताबद्दल चित्रपटांतील समांतर दुवे काढण्यासाठी आदर्श निवड ठरेल. संगीताबद्दल चित्रपटांतील महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्या पात्रांची ‘सिग्नेचर ट्यून’ म्हणावेत असे लहान सांगितिक तुकडे. या ट्यून्स म्हणजे स्टिरिओटिपीकल पात्रं असणाऱ्या विनोदी दृश्यांची सुरुवात, मध्य किंवा शेवट अशा कुठेही वापरता येतील इतक्या स्वैर आणि तितक्याच ताकदीच्या असतात. अशाच ट्यून्स वर उल्लेखलेल्या किंवा इतर कुठल्याही मराठी अथवा हिंदी भाषिक मालिकांमध्ये आढळून येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -