घरफिचर्सलोकल लाईव्ह

लोकल लाईव्ह

Subscribe

मुंबईतील ट्रेनमध्ये गंमतीदार घटना घडत असतात. अशीच एक घटना आज आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. नक्की वाचा हे वर्णन

कडक इस्त्रीचे कपडे घालून वट्ट के साथ फ्लॅटबाहीर पडलेले आपण. अपरंपार गर्दी झालेल्या प्लाटफॉर्मवर खडे, बाकीच्या अपरंपार असंख्यासारखे. मिंटामिंटाला येणार्‍या सुटणार्‍या लोकलमधी कोंबून घेण्यासाठी. थांबल्याजागुनच कवा प्लाटफॉर्मवरच्या घड्याळीकड तर कवा लोकल यायच्या दिशेकडे बार बार लगतार नजर मारीत. पौं..करीत लोकल आली. दरवाजारुपी पावन खिंड रोखून धरलेल्या मराठी, मारवाडी, गुजराती, युपी, बिहारी बाजीभावेस बाजीरावल बाजीमिसरा बाजीयुसुफ बाजीभैया बाजीब्रदरची फळी रेटारेटीनं मोडून मध्दली पब्लिक वनपीसमधी बाहेर उतरली उतरवली, बाहेरली चढली, वोढली, ढकलली, फेकली, पडली, दाबली, दबली, घुसली, पिसली.. हुश्श!!

‘मायच्यान! चढणा रोज का संघर्ष’ मुकाट्याने सुरु. नमनालाच डोक्यात आन वोठात माय बहिणीचा उद्धार भो भे माच्या बाराखडीत सुरू…तो बी पार गर्दीचा भर वोसरेपस्तोर. शिटा मिळालेल्या मशनीचं काम लै बंबाट, त्येचं मधल्या उभ्यायबरबर ‘बैठा स्पोर्ट्स’ सुरु राहतोय नसता तोंडासमोर फोल्ड केलेली ‘आज की ताजा खबर’ नायतर डोळे झाकून बेखबर. बाकी मंग जान हथेली पे लेकर उड्या मारू मारू, नाहीतर टाईमची खोटी करून रिटर्न जाऊ जाऊ स्वासोस्वास निट घेता यील अशा जागा हाशील केलेल्या सीटच्या आजूबाजूला उभं राह्यलेल्या,कमी दबलेल्या, झुंडकरून आलेल्या, शरीरात अतिरिक्तचा जोर किंवा उत्साह असलेल्या मशिनींची खिटपिट आता जोरात सुरु…

- Advertisement -

जय श्रीक्रीष्ण ये —भाई …ओ —भाई.
आटे सायमंड? रेमंड आला का रे
नाश्ता? कल उस्मानभाई लाया था आज म्हात्रे कल अपना डिसुझा…डिसुझा… डिसुझा..अये डिसुझा
लाईन मत तोडो
ये टाईम और एक लोकल शुरू होना मंगता
तारीफ तेरी निकली है दिल से…
ये ट्रॅक तो अन्ग्रेझो ने बिचायेलाय. अपनी गवर्नमेंट को एक एक्स्ट्रा का डालने नही हुआ ये सत्तर सालो मे
कल का म्याच देखा क्या…मेस्सी रोनाल्डो सब फेल इस बार …यंग लोग का टीम हय वोहीच जितेगा पैसा उसिपर लगानेका
मत…लेडीज है
शिर्डी मेरा पंडरर्पुर…
ये पटेली मत झाड…दिखाऊ क्या तेरेकु…तू रुक इधरीच…शर्ट छोड, कॉलरछोड
ये मार उसकू …छोड मत….कुठून कुठून येतात अन…ये घ्या रे याला आत…
अंदर जगह नही है भाई
क्या रे चमन….भाभी दिखी नही आज
खाडी में डालो
आजकाल बहुत लेट होता है ऑफिस से निकलते-निकलते
हु हु हु हा हा हा
भेंडी …
मार ना अंदर …बंदा लटकेला है बाहर.
चढा क्यों?
मोबाईल छोड हाथ पकड …प्रेशर आ राहा है
झोपला होता का रे ?…आता पुढच्या स्टेशनला उतर
कोई कटा क्या? कटा?
शीट! आज फिर लेट होगा ऑफिस को
गर्दी किती वाढलीय
काही नाही हो…फस्कलास सेकंडक्लास सगळं सेम.
या बाहेरच्यांनी पार वाट लावलीय मुंबईची
एसी? ती ट्रेन कै कामाची नाही. आणि पास तिप्पट. छोडो अपनी येही गाडी बेस्ट है!
गया? किती होते?
क्या नही नही बोलरे… अगली बार भी यही आयेगा लिख लो …
चला सुटली एकदाची
अगला स्टेशन त्याचं…
अगला स्टेशन याचं…
अगला..अगला ..अगला…अन आपलं?
मुंडी वर हुईना येवढ्या गर्दीत …डिस्प्ले दिसनार कसा?
अनाउन्समेंट झालती का नाही? का आपनच ऐकायला नाही?
मरूद्या!
ओ फलानं स्टेशन आलं?
आलं?
प्लाटफॉर्म किधर आयेगा? …तीन नंबर?
हां ओ …ओ नही… येल्लो के बाजू में ..ओ …हां
आकडा आणि ब्याग …दोनो
उतरो…उतरा ना काका..
लोकल में शूज पेह्नेका.
पेहली बार चडा है क्या?
पाणी देना जरा..ठंडा
धक्का लगता है तो ट्याक्सी से जाने का. अपनी लोकलसे नही आनेका…समझा!
चल कल मिलते है …बाय
“इस्त्री?”
“जाऊद्या ना ऑफिसच्या ड्रॉवरमधी एक शर्ट ठीवलाय…एक्स्ट्राचा.”
रात्री आठ अठरालाच येनार ना रे?
…हम्म्म!
भावा, ही नुसती झाकीआय, आजून अफ्फाट मुंबई बाकीआय!

– प्रसाद कुमठेकर
(लेखक साहित्यिक आहेत)
————–

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -