घरफिचर्सराष्ट्रवादीची ताकद वाढतेय !

राष्ट्रवादीची ताकद वाढतेय !

Subscribe

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचे भारतीय जनता पार्टीचे स्वप्न धुळीला मिळविणारे जेष्ठनेते आणि राजकारणातील किंगमेकर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा १० जून हा दिवस वर्धापनदिन आहे. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात शरद पवार यांनी नेहमीच आपला दबदबा कायम ठेवला आहे. २०१४ ते २०१९ दरम्यान राष्ट्रवादीला काहीसे वाईट दिवस पहायला मिळाले. मात्र, २०१९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुन्हा एका नव्या वळणार आणले. देशातील आणि राज्याच्या राजकारणातील एक बादशाह असल्याचे शरद पवार यांनी पुन्हा दाखवून दिले. देशात , राज्यात राष्ट्रवादीचा जोरदार कमबॅक झालाच, मात्र, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये देखील राष्ट्रवादी काँगेस पक्षाची ताकद वाढत आहे. राष्ट्रवादीचे हे जोरदार कमबॅक नवी मुंबई आणि पनवेलमधील राजकारणाला कलाटणी देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतातील एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता. महाराष्ट्रातील विद्यमान महाविकास आघाडी सरकारचा घटकपक्ष आहे.

- Advertisement -

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधीं यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. २० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक्ष -अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅमिनेटमंत्री हसन मुश्रीफ, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ , दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, प्रफुल्ल पटेल, सूर्यकांता पाटील, सुप्रिया सुळे आर.आर. पाटील, धनंजय मुंडे, अमोल कोल्हे या पक्षातील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत.१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.

- Advertisement -

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थान हे कायम अढळ राहिले आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम राहिला आहे. अनेकदा शरद पवार यांनी राजकारणातील किंगमेकर म्हणून भूमिका बजावली आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत देशात आणि राज्यात सत्तापरिवर्तन झाले. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आली. पुन्हा आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डोकं वरती काढणार नाहीत असे चित्र निर्माण झाले, काहीअंशी तयार केले गेले. प्रभाव आणि दबाव हि तंत्रे वापरली गेली. मात्र, भाजपला सत्तेच्या प्रभावाचा डोलारा टिकवता आला नाही. सर्वकाही आलबेल असल्याचा समज असलेल्या भाजपला २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मित्रपक्ष असलेल्या काँग्रेससोबत राहून जोरदार धक्का दिला. लोकसभेमधील राष्ट्रवादीची ताकद वाढली. २०१४ ते २०१९ पर्यंत राष्ट्रवादीला आलेली अधोगती शरद पवार यांनी रोखली. देशात आणि राज्यात राष्ट्रवादीचा पुन्हा करिष्मा दिसू लागला. असे म्हणतात ना , ज्या संघटनेचे नेतृत्व खंभीर आणि गंभीर असते त्या संघटनेचे अस्तित्व कोणतेही संकट नष्ट करू शकत नाही. शरद पवार हे असेच एक वादळ आहे , ज्यांनी विरोधकांच्या गडात जाऊन त्यांचे गड उध्वस्थ केले.

२०१४ मध्ये देशात आणि राज्यात सत्तापरिवर्तन झाले. सत्तेच्या गादीची सवय असलेले राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज अस्वस्थ झाले. पाच वर्षात भाजपने देखील प्रभाव आणि दबाव तंत्राचा वापर करून अनेकांना गळाला लावले. २०१९ मध्ये राज्यात पुन्हा भाजपचेच राज्य असेल अशी खात्री झालेले राष्टवादीत तेव्हा जेष्ठ असलेले अनेकजण भाजपात दाखल झाले. मात्र, राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या अनेकांची मोठी निराशा झाली. निवडणुकीत अनेकजण आपटले आणि सत्तेचे स्वप्न भंगले ते वेगळेच.शरद पवारांनी असा काही फास टाकला कि राज्याची सत्ता समीकरणे बदलली. राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले सत्तेपासून लांब राहिले. २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेला सत्तेचा करिष्मा महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदला गेला.

पनवेलमध्ये राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी घौडदौड !
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी ताकदवर होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्याचे पालकत्व राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीच्या आमदार असलेल्या अदिती तटकरे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढत आहे. पनवेल तालुक्यातील राष्ट्रवादीचे संघटन मजबूत होत आहे. ज्या संघटनेचे , पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निष्ठेने काम करतात , संघटना वाढीसाठी सातत्याने झटत असतात, त्या पक्षाला , उभारी मिळायला प्रोत्साहन मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पनवेल तालुक्यातील सक्रिय आणि निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे पनवेलमध्ये राष्ट्रवादी जोर धरत आहे. पनवेल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देणारे पक्षाचे अनेक लढवय्ये शिलेदार आहेत. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदास गोवारी यांनी पनवेल तालुक्यात पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाद्वारे राष्ट्रवादीची प्रतिष्ठा सूरदास गोवारी यांनी कायम उंचावली आहे.

जेष्ठ नेते प्राचार्य बी .ए पाटील यांनी खारघर शहरात पक्ष बांधणीसाठी मोठे योगदान दिले आहे. सामाजिक सलोखा , सामाजिक एकात्मता निर्माण करणारे कार्यक्रम त्यांनी राबविले आहेत. खारघर शहराचे अध्यक्ष बळीराम नेटके एक सच्चा हाडाचा कार्यकर्ता आहे. बळीराम नेटके २००४ राष्ट्रवादीत प्रामाणिपणे सक्रिय आहेत. वॉर्ड अध्यक्ष,खारघर शहर उपाध्यक्ष, खारघर शहर संघटक आणि आता खारघर शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना शरद पवार यांच्या विचारांचा प्रभाव आणि अजित पवार, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे, प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षबांधणीचे काम सुरु आहे. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीला सोडून अनेकजण इतर पक्षात गेले, मात्र बळीराम नेटके यांनी राष्ट्रवादीशी आपले इमान राखत खारघर शहरात पक्षसंघटन वाढविण्यावर भर दिला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल तालुका कार्याध्यक्ष शाहबाझ पटेल यांच्या सारख्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील युवक राष्ट्रवादीमध्ये सहभागी होत आहेत. पनवेल तालुक्यामध्ये आणि विशेषतः तळोजा विभागात पक्ष वाढीसाठी शाहबाझ यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते फारूक पटेल यांचे शाहबाझ पुत्र आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शाहबाझ आपल्या वडिलांसोबत अगदी लहानपणापासून सक्रिय आहेत. पनवेल तालुक्याच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्यानंतर त्यांच्यावर पनवेल तालुका युवक कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाने दिली. तेव्हापासून विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एक धडाडीचे युवा नेतृत्व म्हणून शाहबाझ यांनी आपला ठसा उमटविला आहे. लॉक डाऊनच्या काळात शाहबाझ यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. तब्ब्ल तीन महिने दररोज सुमारे ५०० गोरगरीब जनतेला अन्नदान केले. फळ वाटप , अन्नधान्य वाटप केले. कोरोना रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून रक्तदान शिबीर घेतले. पनवेल तालुक्यामध्ये पार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या वतीने सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते धावून गेले.

नवी मुंबईचा गड सुरक्षित !
नवी मुंबईतून राष्ट्रवादीला संपविण्याचा विडा उचलणार्यांना सामान्य कार्यकर्त्याची ताकद काय असते हे दाखवून देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबईतील खंबीर नेतृत्व म्हणजे अशोक गावडे होय. ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीवर मोठे संकट कोसळले. ते संकट अशोक गावडे यांनी आपल्या खांद्यावर घेतले. नवी मुंबई हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र , अनेक नगरसेवक आमदार गणेश नाईक यांच्या सोबत भाजपात दाखल झाले. परंतु आपल्या तळागाळातील सामान्य आणि सच्चा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अशोक गावडे यांनी पक्षाला सावरले. नवी मुंबईत झालेल्या विराट सभेत अशोक गावडे यांनी विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली. आपला गड सुरक्षित असल्याचा विश्वास अशोक गावडे यांनी नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. महाराष्ट्रात झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर नवी मुंबई राष्ट्रवादीत आणखी जोश आला. भाजपात गेलेले अनेक नगरसेवक स्वगृही परतले. नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत पक्ष बांधणीचे जोरदार काम सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत अशोक गावडे यांनी विरोधकांचा घाम काढला. आता नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार बांधणी सुरु आहे. वॉर्ड प्रमाणे पक्ष बांधणीवर अशोक गावडे यांनी भर दिला आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादीला मजबूत करण्याचे काम यशस्वी होत आहे, येणार्‍या काळात नवी मुंबईतील राष्ट्रवादीची ताकद विरोधकांना दिसेलच, नवी मुंबई महापालिकेवरील राष्ट्रवादीचे वर्चस्व आम्ही कायम राखू , असा विश्वास अशोक गावडे यांनी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केला.

राष्ट्रवादीची ताकद वाढतेय !
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -