Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स चित्रकर्मी भालजी पेंढारकर

चित्रकर्मी भालजी पेंढारकर

भालजींचा जन्म ३ मे १८९८ कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन सहायक शल्यचिकित्सक डॉ. गोपाळराव आणि राधाबाई पेंढारकर यांच्यापोटी कोल्हापुरात झाला. निर्माते-अभिनेते बाबूराव पेंढारकर हे त्यांचे ज्येष्ठ बंधू. चाकोरीबद्ध शालेय शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी तरुणवयातच कोल्हापूर सोडले.

Related Story

- Advertisement -

भालजी पेंढारकर हे भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणार्‍या चित्रकर्मींमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक आणि गीतकार. भालजींचा जन्म ३ मे १८९८ कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन सहायक शल्यचिकित्सक डॉ. गोपाळराव आणि राधाबाई पेंढारकर यांच्यापोटी कोल्हापुरात झाला. निर्माते-अभिनेते बाबूराव पेंढारकर हे त्यांचे ज्येष्ठ बंधू. चाकोरीबद्ध शालेय शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी तरुणवयातच कोल्हापूर सोडले. सुरुवातीच्या काळात पुण्यात केसरी या वृत्तपत्रात नोकरी, छत्रपती शाहूमहाराजांच्या रायबाग कॅम्पमध्ये वास्तव्य आणि सैन्यात भरती काहीशी अशी भटकंती करत ते कोल्हापूरला परतले.

१ ऑगस्ट १९२० रोजी टिळकांचे निधन झाले, तेव्हा व्यथित झालेल्या भालजींनी लोकमान्यांचा स्वर्गीय संदेश ही पुस्तिका लिहून प्रकाशित केली आणि चौकाचौकात विकली. भालजींच्या लिखाणाचा श्रीगणेशा अशाप्रकारे झाला. १९२१ मध्ये भालजींनी संगीत कायदेभंग, भवितव्यता, क्रांतिकारक, राष्ट्रसंसार, आसुरी लालसा आणि अजिंक्यतारा ही सहा नाटके लिहिली, त्यांत अभिनयही केला. त्यांनी असीरे हर्स या उर्दू नाटकाचे केलेले मराठी रूपांतर आसुरी लालसा (१९२५) हे रुस्तमजी यांच्या आर्य सुबोध नाटक मंडळीतर्फे रंगमंचावर आले आणि खूप गाजले. पुढे भालजींनी मार्कंडेय (अपूर्ण), रजहृदय, उदयकाळ, जुलूम, राणीसाहेब, खूनी खंजर, बाजीराव-मस्तानी, वंदे मातरम् -आश्रम, बाजबहाद्दूर अर्थात राणी रूपमती या मूकपटांचे लेखन आणि त्यातल्या काहींचे दिग्दर्शनही केले. बकंभट या व्यंगपटाचे लेखन-दिग्दर्शन केल्यानंतर त्यांनी सरस्वती सिनेटोन या चित्रसंस्थेच्या श्यामसुंदर (१९३२) या पौराणिक बालचित्रपटाची दिग्दर्शन-पटकथा-संवाद-गीते अशी आघाडी सांभाळली. भारतीय चित्रपटसृष्टीतला हा पहिला बालचित्रपट हिंदी आणि बंगालीमध्ये निर्माण झाला होता, तसेच पहिला रौप्यमहोत्सवी चित्रपट होण्याचा मानही त्याने मिळवला.

- Advertisement -

भालजींनी कोल्हापूर छत्रपतींकडून कोल्हापूर सिनेटोन हा स्टुडिओ खरेदी केला आणि त्याचे नामकरण जयप्रभा स्टुडिओ असे केले (१९४५). तेथील वातावरण चित्रनिर्मितीस पोषक आणि नेहमी शिस्तप्रिय असेल याकडे भालजींचा कटाक्ष असे. तेथे त्यांनी अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांना घडवले आणि चित्रपटनिर्मितीचे कार्य दीर्घकाळ सुरू ठेवले. १९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये हा स्टुडिओ जाळला गेला. त्यात नुकतेच तयार झालेले मीठभाकर व बाळ गजबरांचा मेरे लाल या चित्रपटांच्या प्रतीही नष्ट झाल्या. या घटनेमुळे दीड-दोनशे अभिनेते, तंत्रज्ञ आणि कामगार यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला; मात्र भालजींनी आपली जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर जयप्रभा पुन्हा उभा केला व या चित्रपटांची पुनर्निर्मिती केली.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. जय भवानी (१९४७ ), शिलंगणाचे सोने (१९४९), छत्रपती शिवाजी (१९५२), अशी शिवचरित्रावर आधारित चित्रपटांची निर्मिती जयप्रभा स्टुडिओत सुरू राहिली. अशा या महान निर्मात्याचे २६ नोव्हेंबर १९९४ रोजी निधन झाले.

- Advertisement -