उडत्या तबकड्यांचे गूढ !

एखाद्या हॉलीवूड चित्रपटाप्रमाणे परग्रहवासी पृथ्वीवर येतात. इथली माणसे, जनावरे आपल्या स्पेस शटलमध्ये उचलून नेतात. प्रयोगशाळेत बेडूक व इतर किडे-मकोडे कापावे तसे माणसांचे अवयव कापाकापी करत नको ते प्रयोग केवळ पृथ्वीवरच नव्हे तर ते आपल्याबरोबर पळवून नेत असलेल्या पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलेच नाही तर जनावरांवरदेखील करतात, अशा भयानक व थरकाप उडवणार्‍या गुप्त नोंदी आहेत. परग्रहवासी येतात ते वाहन म्हणजे यूएफओची पहिली नोंद तशी खूप जुनी आहे, परंतु आजही यूएफओ हा भयावह, गंभीर व तितकाच रंजक विषय आहे.

१३ सप्टेंबर २०२२ रोजी स्वित्झर्लंडमधील खगोलशास्त्रज्ञ साशा क्वांज यांनी पुढील २५ वर्षात आपण एलियन्ससोबत जगत असू असा खळबळजनक दावा केल्याच्या बातम्या जगभरातील न्यूज पोर्टलने कव्हर केल्यात आणि पुन्हा एकदा यूएफओ व एलियन्सवर वादप्रतिवादाला सुरूवात झाली. १९९५ मध्ये मानवाने आपल्या सौरमालेबाहेरील पहिला ग्रह शोधून काढला. आज २७ वर्षात माणसाने सौरमालेबाहेरील तब्बल ५००० पेक्षा अधिक ग्रहांचा शोध लावलेला आहे. सध्या आपण सौरमालेबाहेरील दररोज एक नवा ग्रह शोधून काढतो. मात्र आपल्या आकाशगंगेत १० हजार कोटींपेक्षा जास्त ग्रह तारे असल्याचं संशोधक सांगत आहेत.

मानवाने आता एवढी यंत्रणा नक्कीच विकसित केली आहे की, उपकरणाच्या सहाय्याने ब्रह्माण्डात आपल्यासोबत कोणकोण कुठे आहे हे समजेल असेही साशा क्वांज म्हणाले. पृथ्वीवरचा माणूस लवकरच आपल्या सूर्यमालेबाहेरील जीवनाचा शोध लावेल असे ही त्यांनी म्हटले आहे. साशा क्वांज यांचे स्पष्ट मत आहे की, पृथ्वीप्रमाणेच अनेक ग्रहांवर हुबेहुब पृथ्वीसारखे वातावरण व पाणी सापडू शकते. भविष्यात आपल्याला या ग्रहांवर अवकाशयान पाठवता येईल.

दुसर्‍या विश्वयुद्धानंतर रॉकेटचा विकास आणि यूएफओ हा एक प्रमुख आवडीचा विषय बनला होता. यूएफओ म्हणजे अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्टस् अर्थात ज्यांची माहिती नाही अशा अज्ञात गोष्टी! यूएफओ या उडत्या तबकड्या म्हणूनदेखील ओळखल्या जातात. काही संशोधकांनी पृथ्वीला भेट देणारे हे बुद्धिमान अलौकिक जीव असल्याचे सप्रमाण दाखविले. त्यानंतर अचानक २००४ सालापासून जगभरातील अनेक लोकांनी एलियन आणि यूएफओ पाहिल्याच्या दाव्यांमध्ये वेगवान वाढ झाली आहे. विश्वात एलियन्स अस्तित्वात आहेत का? या उपायाचे उत्तर शोधण्यासाठी आजही शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे संशोधन करत आहेत. आज चीन आणि अमेरिका एकमेकांवर कुरघोडी करताना परग्रहवासीयांची मदत घेत या पृथ्वीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची शंका येते. एका बाजूला उडत्या तबकड्या व दुसर्‍या बाजूला मानवी सभ्यतेचे भविष्य यात कोण किती काळ तग धरत तरंगेल हाच खरा प्रश्न आहे.

अनेक वर्षांच्या वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले की इसवी सन पूर्व १० हजार साली एलियन्स पृथ्वीवर प्रगटले होते. आज ज्यांना आपण देव समजतो ते एलियन्सने प्रथम मानवी वंशाच्या सरदारांना ज्ञान दिले व नंतर त्यांनी राजांना त्यांचे दूत बनवले. त्यांनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या परंपरा आणि समाज निर्माण केले. एलियन्स पृथ्वीचे देव किंवा देवदूत बनले. अगदी गेल्या आठवडयात म्हणजे १६ जून २०२२ रोजी जगभर बातम्या पसरल्या की, चीनला एलियन सभ्यता सापडली. अशा बातम्यांनी जगभर खळबळ उडाली. गुईझोउ प्रांतातील नैऋत्य भागात ४८८ मीटर व्यासाची म्हणजे सुमारे अर्धा किलोमीटरची ही रेडिओ दुर्बिण आहे. या दुर्बिणीचे मुख्य कार्य म्हणजे एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स असलेले जीव आणि सभ्यता शोधणे हेच होय. जगातील सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोप ‘फास्ट’ म्हणजेच स्काई आईद्वारे चीनच्या शास्त्रज्ञांना परग्रहवासीयांचे संदेश मिळालेत आणि चीनने एलियन्सशी संधान साधले अशा बातम्या झळकल्यात.

बीजिंग नॉर्मल यूनिव्हर्सिटीच्या चाइना एक्स्ट्राटेरेस्ट्रियल सिविलाइजेशन रिसर्च ग्रुपचे प्रमुख वैज्ञानिक प्रो. झांग तोंगजी यांनी परग्रहवासीयांचे संदेश पकडल्याची माहिती जाहीर केली. विशेष म्हणजे २०२० मध्येदेखील दोनदा असे संदेश त्यांना मिळाले होते. परग्रहावरून आलेले संदेश चीनच्या शास्त्रज्ञांनी विश्लेषित केले. चीनच्या विज्ञान मंत्रालयाने अधिकृत अहवाल बनवून सरकारी मीडियाने तो आपल्या ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेली’ या सरकारी वृत्तपत्रात ऑनलाइन प्रकाशित केला आणि नंतर अत्यंत संदिग्धतेने कुठलेही कारण न देता हटविलादेखील!

विश्वाच्या अद्भुत पसार्‍यात मानवी सभ्यता एकमेव आहे असा गोड गैरसमज असणे ही खरंतर अंधश्रद्धा म्हणावी लागेल. आपल्या आकाशगंगेच्या अनोख्या रहस्यमयी दुनियेत किमान चार सजीव सभ्यता अर्थात परग्रहवासी राहतात हे पचनी न पडणारे सत्य आहे. यात सरपटणार्‍या प्राण्यांच्या प्रजाती मानवांवर नियंत्रण ठेवू इच्छितात असा दावा यापूर्वी, एका शास्त्रज्ञाने केला होता. या सरपटणार्‍या प्रजातीचे वर्णन अत्यंत आक्रमक असे केले आहे. जगभरात फॅसिस्ट कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची त्यांची योजना आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. यात चीनने नेमका कोणाशी संपर्क साधला हा खरा प्रश्न आहे.

एखाद्या हॉलीवूड चित्रपटाप्रमाणे परग्रहवासी पृथ्वीवर येतात. इथली माणसे जनावरे आपल्या स्पेस शटलमध्ये उचलून नेतात. प्रयोगशाळेत बेडूक व इतर किडे-मकोडे कापावे तसे माणसांचे अवयव कापाकापी करत नको ते प्रयोग केवळ पृथ्वीवरच नव्हे तर ते आपल्याबरोबर पळवून नेत असलेल्या पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलेच नाही तर जनावरांवरदेखील करतात, अशा भयानक व थरकाप उडवणार्‍या गुप्त नोंदी आहेत. परग्रहवासी येतात ते वाहन म्हणजे यूएफओची पहिली नोंद तशी खूप जुनी आहे, परंतु आजही यूएफओ हा भयावह, गंभीर व तितकाच रंजक विषय आहे. इसवी सन ७४० मध्ये आयरिश इतिहासकारांनी अधिकृतपणे संपूर्ण फौजफाट्यासह परग्रहवासी जहाजे हवेत उडतानाच्या नोंदी ठेवल्या आहेत. गेली एक हजार २६० वर्षे परग्रहवासी अर्थात एलियन्स अत्याधुनिक स्पेस शटलद्वारे पृथ्वीवर उतरत विविध करामती करीत आले आहेत. हेच स्पेस शटल आपण उडत्या तबकड्या म्हणून ओळखतो.

पहिले सुप्रसिद्ध यूएफओ दर्शन १९४७ मध्ये घडले असे मानले जाते. व्यापारी असलेला केनेथ अरनॉल्ड हे छोटे विमान घेऊन उड्डाण करत होते. यांनी वॉशिंग्टनमधील माऊंट रेनियर जवळ नऊ हाय-स्पीड ऑब्जेक्ट्सचा एक समूह पाहिल्याचा दावा केला होता.

असे असले तरी भारतात छत्तीसगड राज्यातील चरामा, कांकेर या ठिकाणी सापडलेल्या हिंदू धर्माशी संबंधित पूर्व-ऐतिहासिक दगडी गुहांतील रेखाटन चित्रांमध्ये आधुनिक काळातील स्पेस सूटसारखे सूट परिधान केलेल्या मानवी आकृत्या आणि फ्लाइंग सॉसरसारखी रेखाचित्रे, प्रत्येक पंख्यासारखा अँटेना आणि तीन पाय असलेले एलियन्स रंगवलेली आहेत, जो केवळ बुद्धीचा कल्पनाविलास समजून सोडून देणे निव्वळ अशक्य आहे. गेली अनेक दशके अत्यंत गुप्त असा अमेरिकेतल्याच नेवाडामध्ये अ‍ॅडव्हान्स एअरक्राफ्टसाठीचा टेस्टिंग बेस आहे, जो ‘एरिया ५१’ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी यूएफओ रिसर्च सेंटर व अमेरिकी सरकार या ठिकाणी अ‍ॅडव्हान्स एलियन टेक्निकचा सराव होतो अशा असंख्य बातम्या आहेत.

येथील कर्मचारी बॉब लेजरचा या व्यक्तीने दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये अमेरिकेतील गोपनीय लष्करी तळ एरिया ५१ चा समावेश आहे. अमेरिकेन सरकारने अधिकृत एलियन स्पेसक्राफ्टसोबत पृथ्वी नियंत्रणाचे काम करण्यासाठी करार केला आहे. विश्वाच्या अथांग भवसागरात, यूएफओ, उडत्या तबकड्या यात मानवी सभ्यतेचे भविष्य तरंगते असेल की, स्वातंत्र्याची वेगळी छाप सोडणारे, या प्रश्नाचे उत्तर काळच देईल. मात्र तूर्त ेतरी जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने गुरु ग्रहांपेक्षा १२ पट जास्त मोठा एक्सोप्लॅनेट HIP ६५४२६ B चे संशोधन केले असतानाच स्वित्झर्लंडमधील खगोलशास्त्रज्ञ साशा क्वांज यांनी केलेल्या वक्तव्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. उडत्या तबकड्यांचा शोध अन् तरंगत्या मानवी भविष्याचा बोध, आपल्याला कोठे व कोणत्या एलियन्ससोबत नेईल याचे पुढील २५ वर्षात आपण साक्षीदार असू हे नक्की!