घरफिचर्ससारांशआर्थिक स्वातंत्र्याचा मूलमंत्र!

आर्थिक स्वातंत्र्याचा मूलमंत्र!

Subscribe

अर्थसंपन्न होणे आणि आर्थिक स्वातंत्र्य हे खूप महत्त्वाचे आहे. अर्थसंंपन्न होणे म्हणजे आपल्याकडे चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसा पैसा असणे असे होय. प्रत्येक माणसाच्या जीवनात लग्न, घर, कार, मुलांना उत्तम शिक्षण देणे, त्यांच्या लग्नाची तरतूद करणे तसेच आजारपण आले तर हाताशी पैसे असणे हा अर्थसंपन्न होण्याचा भाग आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला जे करावेसे वाटते, ज्यात आनंद आहे ते करण्यासाठी वेळ मिळणे व त्यातही रोज काम न करता पैसे येणे असा अर्थ आहे. आपण प्रत्येक बाजूच्या उत्पन्न मार्गाचा थोडक्यात आढावा घेऊ.

रॉबर्ट किओसाकी यांचे गाजलेले पुस्तक रिच डॅड आणि पुअर डॅड (श्रीमंत बाप आणि गरीब बाप) हे सर्वांनी वाचावे असे पुस्तक आहे. विशेषतः जे नवउद्योजक आहेत किंवा युवा पिढी आहे आणि जे काहीतरी करिअर करण्याच्या तयारीत आहेत, त्यांनी तर हे पुस्तक जरूर वाचावे तसेच पालकांनीसुद्धा हे पुस्तक जरूर वाचावे. नोकरी करावी की स्वत:चा व्यवसाय करावा की गुंतवणूकदार व्हावे हे अतिशय उत्तमरित्या ह्या पुस्तकात मांडले आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय हेसुद्धा यात शिकायला मिळते. ह्या पुस्तकातील मला अतिशय आवडलेला टॉपिक म्हणजे उत्पन्नाच्या दोन बाजू आणि त्याचे चार चौकोन.

श्रीमंत बाप आपल्या मुलाला सांगतो की, व्यवहारज्ञान मिळेल इतकेच शिक्षण घे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू कर आणि गरीब बाप त्याच्या मुलाला सांगतो की, चांगले शिक्षण घे, पदव्या मिळव आणि कुठेतरी नोकरी कर. असा फरक श्रीमंत बाप आणि गरीब बाप यांच्यामध्ये आहे आणि काही कालावधीनंतर श्रीमंत बापाचा मुलगा हा खूप मोठा गुंतवणूकदार झालेला असेल आणि गरीब बापाचा मुलगा हा सर्वसामान्य आयुष्य जगत असतो आणि आयुष्यभर दुसर्‍याकडे नोकरी करीत असेल. अर्थात श्रीमंत बाप आणि गरीब बाप हे काल्पनिक बाप ह्या पुस्तकात विषय समजून सांगण्याकरिता घेतले आहेत.

- Advertisement -

ह्या पृथ्वीवरील कोणत्याही माणसाचे उत्पन्न हे फक्त चार गोष्टींपासून मिळते, परंतु ते कोणत्या बाजूपासून येते हे ठरवत असते की तुम्ही किती लवकर अर्थसंपन्न होणार आहात. लवकर अर्थसंपन्न होण्यासाठी तुमचे उत्पन्न हे चौकोनाच्या उजव्या बाजूतील मार्गापासून असावे.

१. नोकरी ः तुम्ही लोकांसाठी काम करता.
३. उद्योजक : तुमचा स्वतःचा उद्योग असतो व लोक तुमच्यासाठी काम करतात.
२. स्वयंरोजगार : तुम्ही स्वतःसाठी काम करता.
४. गुंतवणूकदार : पैसा तुमच्यासाठी काम करतो.

- Advertisement -

अर्थसंपन्न होणे आणि आर्थिक स्वातंत्र्य हे खूप महत्त्वाचे आहे. अर्थसंंपन्न होणे म्हणजे आपल्याकडे चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसा पैसा असणे असे होय. प्रत्येक माणसाच्या जीवनात लग्न, घर, कार, मुलांना उत्तम शिक्षण देणे, त्यांच्या लग्नाची तरतूद करणे तसेच आजारपण आले तर हाताशी पैसे असणे हा अर्थसंपन्न होण्याचा भाग आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला जे करावेसे वाटते, ज्यात आनंद आहे ते करण्यासाठी वेळ मिळणे व त्यातही रोज काम न करता पैसे येणे असा अर्थ आहे. आपण प्रत्येक बाजूच्या उत्पन्न मार्गाचा थोडक्यात आढावा घेऊ.

डावी बाजू नंबर १. : नोकरी : या पुस्तकातील गरीब बाप त्याच्या मुलाला हाच सल्ला देतो की, चांगली डिग्री घे आणि कुठेतरी नोकरी कर, परंतु लवकर अर्थसंपन्न होणे आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविणे हे काही नोकरी करणार्‍याला शक्य होत नाही. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे मी काही काम केले नाही तरीही मला चांगले जीवन जगण्यासाठी उत्पन्न हे ठरावीक वेळेत मिळायला हवे. आता जो दुसर्‍याकडे नोकरी करतो त्याला रोज नोकरीवर जावेच लागते. गेले नाही तर त्याला पगार मिळणार नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे लवकर अर्थसंपन्न होणे. हेसुद्धा नोकरी करणार्‍या माणसाला शक्य होत नाही. कारण ठरावीक पगारातून घरखर्च, मुलांचे शिक्षण, घर घेतले असेल तर त्यासाठी घेतलेल्या गृहकर्जाचे हफ्ते, कार घेतली असेल तर कारसाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते या सर्वांमध्ये मिळणार्‍या पगाराची रक्कम खर्च झाली तर बचत करण्यासाठी काही उरत नाही आणि मग अर्थसंपन्न होणे हे स्वप्नच ठरते. सर्वात महत्त्वाचे नोकरीतून रिटायर्ड झाले तर पगारातून जे काही सेव्हिंग केलेलं असेल (पीएफ, भविष्य निर्वाह निधी) त्यावर अवलंबून राहावे लागते. म्हणजे डाव्या बाजूतील नंबर एकपासून ज्या लोकांचे उत्पन्न येते त्यांना आर्थिक स्वातंत्र्य व अर्थसंपन्न होणे हे कठीण होते. नोकरी करणार्‍या माणसाचा रिस्क न घेण्याचा स्वभाव असतो. ठरावीक उत्पन्नावर खूश असणे आणि अल्पसंतुष्ट असणे हा गुणधर्म त्यात असतो.

डावी बाजू नंबर २ : स्वयंरोजगार : स्वयंरोजगार हा प्रकार हा काही प्रमाणात नोकरी करण्यासारखाच असतो, परंतु यात काही फरकसुद्धा आहे. डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, इंजिनिअर यांचा यात समावेश होतो. स्वतःचे स्किल वापरून या प्रकारात उत्पन्न मिळते. यात महत्त्वाचे म्हणजे जेवढे काम करू तेवढेच पैसे मिळतात. रोज कामावर गेले नाही तरी चालते, परंतु सर्व्हिस सेक्टर असल्यामुळे तेसुद्धा आता सोपे राहिले नाही. फिक्स उत्पन्न नाही, त्यामुळे बचत, निवृत्तीनंतरचे उत्पन्न हे आज काय गुंतवणूक करणार, सेव्हिंग करणार त्यावर अवलंबून असणार आहे. फक्त यात काही प्रमाणात नोकर ठेवून त्यांच्याकडून काही प्राथमिक काम करून घेता येते. लवकर अर्थसंपन्न होणे व आर्थिक स्वातंत्र्य हे नंबर १ म्हणजे नोकरी करणार्‍या व्यक्तीसारखेच असते, परंतु या प्रकारातील लोक नोकरीवाल्यांपेक्षा थोडी जास्त रिस्क घेत असतात.

उजवी बाजू नंबर ३ : उद्योजक : इथे स्वतःचा उद्योग असतो व हा उद्योजक लोकांकडून काम करून घेतो. टीम तयार करतो. टीममध्ये कामाचे विभाजन करतो. रिस्क घेण्याचा स्वभाव याचा असतो. स्वतः काम नाही केले तरीही टीम काम करते. त्यामुळे उत्पन्न सतत सुरू असते. लवकर अर्थसंपन्न होतो व आर्थिक स्वातंत्र्यसुद्धा उद्योजकाला असते. भविष्याचं योग्य नियोजन करतो. जगातील जे काही १०० श्रीमंत व्यक्ती आहेत त्यातील बरेच हे मोठे उद्योजक आहेत. नफा विभागणी (वेल्थ शेअरिंग) या महत्त्वाच्या तत्त्वावर उद्योजक काम करीत असतात आणि विशेष बाब म्हणजे डाव्या बाजूमधील जे दोन लोक आपण बघितले म्हणजे नोकरदार आणि स्वयंरोजगार करणारे यांच्याकडून हा उद्योजक काम करून घेतो. कामाचे टीममध्ये विभाजन केल्याने यांच्याकडे वेळ असतो व कुटुंबासाठी वेळ देणे, नवीन व्यवसाय कल्पना शोधणे, त्यावर काम करणे यावर हा वेळ तो उपयोगात आणतो. अंबानी, टाटा, बिर्ला, कोटक, हे काही मोठे उद्योजक यात येतात. अर्थात छोटे उद्योजकसुद्धा या प्रकारात आहेत.

उजवी बाजू नंबर ४. : गुंतवणूकदार : हा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. हा वेगवेगळ्या उद्योगांत गुंतवणूक करतो. याची रिस्क घेण्याची कॅपॅसिटीही मोठी असते. याने काम केले नाही तरी याच्या गुंतवणुकीवर २४ तास उत्पन्न सुरू असते. याला आर्थिक स्वातंत्र्य असते व हा अर्थसंपन्नसुद्धा असतो. वॉरेन बफेट, स्व. राकेश झुनझुनवाला अशी काही नावे गुंतवणूकदार या प्रकारात सांगता येतील. टाटासुद्धा अनेक उद्योगांत गुंतवणूक करतात. स्टार्टअपसाठी गुंतवणूक करणारे एंजल गुंतवणूकदारसुद्धा या प्रकारात मोडतात.

थोडक्यात तुम्हाला लवकर अर्थसंपन्न व्हायचे असेल तर तुमचे उत्पन्न हे चौकोनाच्या उजव्या बाजूपासून मिळणारे असावे म्हणजे उद्योजक किंवा गुंतवणूकदार असणे गरजेचे आहे. मी माझ्या सेमिनारमध्ये वरील चार चौकोन समजावून सांगताना अनेक लोक प्रश्न विचारतात की आम्ही नोकरी करतो किंवा स्वयंरोजगार करतो तो लगेच बंद करून उद्योजक व्हायचे का? याचा अर्थ असा नाही की डाव्या बाजूला असणार्‍या लोकांनी त्यांची नोकरी किंवा स्वयंरोजगार सोडून लगेच उद्योजक किंवा गुंतवणूकदार व्हावे, परंतु डावीकडून प्रवास सुरू करून हळूहळू उजवीकडे जाण्याचे ध्येय जरूर असावे. म्हणजे नोकरी जरी करीत असाल तर रिकाम्या वेळेत व्यवसाय करावा. त्याचे रूपांतर उद्योगात करावे व गुंतवणूकदार तर तुम्हाला कधीही होता येते. अनेक गुंतवणुकीची माध्यमे उपलब्ध आहेत. त्याद्वारे गुंतवणूक करून आपण गुंतवणूकदार बनू शकतो. फ्लिपकार्टची बन्सल जोडी आधी अमेझॉनमध्ये नोकरी करीत होती. ते करून त्यांनी फ्लिपकार्ट सुरू केले आणि तीच कंपनी त्यांनी अ‍ॅमेझॉनला काही कोटी रुपयांना विकली.

उद्योगात गुंतवणूक : उद्योग सुरू करणेसुद्धा सोपी गोष्ट नाही, परंतु तुम्ही चालू असलेल्या उद्योगातसुद्धा गुंतवणूक करू शकता. अनेक चांगले उद्योग असतात. त्याच्या प्रॉडक्टला बाजारात चांगली मागणी असते. त्या उद्योगाची सिस्टीम लागलेली असते. त्यांनाही कधी भांडवली गरज असते. त्यात भागीदार किंवा शेअर होल्डर होऊनसुद्धा तुम्ही गुंतवणूकदार होऊ शकता. स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणारे लोक अशीच गुंतवणूक करून थोड्या दिवसांत मोठा नफा मिळवून आपली गुंतवणूक काढून घेऊन दुसरीकडे गुंतवतात, परंतु यासाठी कुठे गुंतवणूक करायची, कुठला उद्योग चांगला याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही त्यातील तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेऊ शकता.

आध्यात्मिक उद्योजकता :
चॅरिटेबल संस्थांना देणगी देणारे किंवा अशा संस्था चालविणारे चौकोनातील उजव्या बाजूचेच लोक आहेत. टाटा ट्रस्ट, अझीम प्रेमजी, इन्फोसिस फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन हे सेवाकार्यासाठी देणगी देणार्‍यांमध्ये वरच्या क्रमांकावर आहेत. वॉरेन बफेट असो किंवा बिल गेट्स हेसुद्धा चॅरिटेबल काम करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये देतात. उद्योग करताना आध्यात्मिकता असली तर मोठे सेवाकार्यसुद्धा तुम्ही करू शकता. अर्थातच त्यासाठी तुमची अर्थसंपन्नता हवी.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -