Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स जहॉ हुए बलिदान मुखर्जी, वह कश्मीर हमारा है!

जहॉ हुए बलिदान मुखर्जी, वह कश्मीर हमारा है!

भारतीय संस्कृतीचे निस्सीम उपासक, थोर शिक्षणतज्ञ, भारतीय जनसंघाचे संस्थापक, लोकशाही संकेताचे भाष्यकार, अद्वितीय संसदपटू आणि काश्मिरच्या बलिवेदीवर आपल्या प्राणांची आहुती देणारे भारत मातेचे थोर सुपूत्र डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा २३ जून हा स्मृतीदिन. या निमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित विशेष लेखाचा अंतिम भाग

Related Story

- Advertisement -

स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांना सन्मानाने स्थान देण्यात आले. पण पंडीत नेहरुंशी काश्मिर प्रश्नावरून झालेल्या संघर्षाचे रुपांतर त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यात झाले. १ एप्रिल १९५० रोजी डॉ. मुखर्जींनी मंत्रीपदाची वस्त्रे उतरवली आणि सार्‍या भारतीयांच्या मनात त्यांनी आपल्या त्यागी व कर्तव्यनिष्ठ जीवनाचा चिरंतन ठसा उमटविला. २१ ऑक्टोबर १९५१ रोजी भारतीय जनसंघाची स्थापना करण्यात आली. केवळ सार्वत्रिक निवडणूकाकरिता जनसंघाचा जन्म झालेला नाही. तर राष्ट्रघडणीच्या विशेष व चिरकालीन कार्यासाठीच जनसंघाची स्थापना झाली आहे. लोकजागृतीसाठी देशभर दौरे काढून त्यांनी पाकिस्तानकडून काश्मिर बळकावण्यासाठी होणार्‍या कट कारस्थानांकडे जागरुकतेने लक्ष ठेवण्याची जाणीव दिली. इतकेच नाही तर अखेरीस पाकिस्तानला सोयिस्कर अशी देशघातकी भूमिका घेणारे काश्मिरचे त्या वेळचे पंतप्रधान स्वयंभू तारणहार शेख अब्दुल्ला यांच्या कैदेत असतांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे सिद्ध करतांना गुढ गुप्ततेच्या वातावरणात २३ जून १९५३ रोजी काश्मिरसाठी, काश्मिरमध्ये निशांत या जेलमध्ये मरण पत्करावे लागले.

अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन मार्च २००० च्या अखेरीस भारतात आले होते. काश्मिरची प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ही दक्षिण आशियातील सर्वाधिक स्फोटक व गंभीर समस्या असल्याचे भाष्य त्यांनी केले होते. पण ही सर्वाधिक स्फोटक व गंभीर परिस्थिती निर्माण होऊच नये यासाठी भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील उद्योगमंत्री व त्यावेळच्या भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जीवापाड प्रयत्न करून पंडित नेहरू यांना काश्मिरप्रश्नाबाबत राष्ट्रहिताच्या तळमळीने सावध होण्याचा इशारा 50 वर्षापूर्वीच दिला होता. आज २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर इंटरनेट युगाकडे भरारी सुरू असतांना दैवयोग असा की डॉ. मुखर्जींनी पं. नेहरुकडून अपेक्षिलेली व्यापक राष्ट्रहिताची भूमिका आणि काश्मिर प्रश्नावर जागतिक समर्थन मिळविणेची पं. नेहरुची आकांक्षा, डॉ. मुखर्जीच्या सहवासात उदात्त राजनीतीचे पाठ घेतलेले, त्यांचे स्वीय सहाय्यक असलेले अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना अनुभवायला आले. पण डॉ. मुखर्जीनी बलिदान केले ती भावनात्मक, तात्विक, व्यावहारिक, निखळ एकात्मता काश्मिरमध्ये अनुभवास येत नाही. उलट अब्जावधी रुपये केंद्र शासनाने काश्मिरसाठी खर्च केले. हजारो जवानांचे रक्त करून लाखो अंतःकरणे पेटून कार्याला आली.

- Advertisement -

अखंड भारतासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी तयारी झाली. त्यांनी लावलेल्या राष्ट्रप्रेमाच्या नंदादीपाची ज्योत कोट्यावधी भारतीयांची अंतःकरणे उजळवून टाकीत आहेत. भारतीयांना चिरंतन प्रेरणा देणारे त्यांचे काश्मिरच्या बलिवेदीवरचे बलिदान राष्ट्र उभारणीच्या यज्ञातील पवित्र समिधा आहे. समर्थ, संपत्र, सुसंघटित भारत निर्मितीच्या यज्ञदेवतेला अर्पण झालेली ती एक परम मंगल आहुती आहे. या यज्ञाने सारे विश्व उजळुन निघण्याची अंतिम यशदायी ग्वाही डॉ. मुखर्जीच्या पवित्र व तेजस्वी बलिदानाने सार्‍या जगाला दिली गेली आहे! हा यज्ञ अखंड चालू ठेवण्याची प्रेरणा डॉ. मुखर्जी यांची स्मृती प्रत्येक भारतीयाला देत आहे!! डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी अमर आहेत !!! जहाँ हुआ बलिदान मुखर्जी वह कश्मिर हमारा है ॥नही नही जागीर किसीकी वह कश्मिर हमारा है ॥

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे २१ ऑक्टोंबर १९५१ या ऐतिहासिक दिवसाचे पुढील बोल दीपस्तंभासारखे सदैव मार्गदर्शन करीत राहणार आहेत. ‘‘हम पूर्ण विश्वास, आशा और उत्साह के साथ इन मंगलपथ की और अग्रेसर हो रहे है। हमारे कार्यकर्ता बराबर यह ध्यान में रखे की केवल सेवा और त्याग के बलपर ही वे जनता का विश्वास जीतने में सामर्थ हो सकेंगे । हमारे सन्मुख स्वतंत्र्य भारत के पुनर्जीवन और इसके पुननिर्माण का महान कार्य है। जननी जन्मभूमी वर्ग, शांती और धर्म के भेदभाव को छोड़ अपने सभी बच्चोंको आव्हान कर रही है। वर्तमान का चित्र अभी चाहे कितना ही कलिमापुर्ण क्यों न हो, आनेवाले वर्षोंमें भारत का अपनी भाग्यरेखा खीचती है। सर्व शक्तीमान प्रभू हमें गन्तव्य पथ पर अविश्रांत चलने की प्रेरणा शक्ती और ध्येर्य दे। हम भय और प्रलोभनोंकी झंझट से अविचलित रह कर भारत को आध्यात्मिक एवं भौतिक दृष्टीसे महान और शक्तीशाली बनाएँ। ताकी वह विश्वशांती और समृद्धीकी रक्षा में आदर्श रूप में सहाय्यक हो सके ।’’

- Advertisement -