घरभक्तीHoli 2023 : आज आहे होळी, जाणून घ्या होलिका दहनाचा मुहूर्त आणि...

Holi 2023 : आज आहे होळी, जाणून घ्या होलिका दहनाचा मुहूर्त आणि महत्त्व

Subscribe

हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजल कुळी, उकुळी, फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात.

होळी तिथी प्रारंभ :  आज, सोमवार 6 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 4:17 पासून सुरु ते 7 मार्च 2023 संध्याकाळी 6:09 पर्यंत त्यामुळे 6 मार्च रोजी संध्याकाळी होलिका दहन केले जाईल. तसेच 7 मार्च रोजी रंगपंचमी साजरी केली जाईल.

- Advertisement -

आजचे काही शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – 12.09 पासुन 12.56 पर्यंत असेल
विजय मुहूर्त- दुपारी 2.30 ते दुपारी 3.16
निशिता मुहूर्त- मध्यरात्री 12.7 पासुन 12.57 पर्यंत

होलिका दहन मुहूर्त

6 मार्च 2023, सोमवार, संध्याकाळी 6:24 पासून रात्री 8:51 पर्यंत असेल. यंदा होलिका दहन 2 तास 27 मिनिटांचे असेल.

- Advertisement -

होळी सणाचे महत्त्व

HOLIKA DAHANA - March 7, 2023 - National Today

हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. अध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या विशेष प्रसंगी सर्व देवी-देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते. यंदा रंगपंचमी बुधवारी खेळली जाणार आहे.


हेही वाचा :

30 वर्षांनंतर होळीच्या दिवशी बनतोय ‘हा’ दुर्लभ योग; होणार धनलाभ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -