घरभक्तीआज आहे विजया एकादशी; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

आज आहे विजया एकादशी; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Subscribe

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हटले जाते. आज (16 फेब्रुवारी) रोजी विजया एकादशीचे व्रत केले जाईल. विजया एकादशी चे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. विजया एकादशीला श्री विष्णूंचे मनोभावे स्मरण केल्यास व्यक्तिच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात. तसेच या दिवशी श्री विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

विजया एकादशी मुहूर्त

एकादशी प्रारंभ : 16 फेब्रुवारी, गुरुवारी सकाळी 5 वाजून 32 मिनिटांपासून
एकादशी समाप्त: 17 फेब्रुवारी, शुक्रवारी सकाळी 2 वाजून 29 मिनिटांपासून

- Advertisement -

विजया एकादशी पूजा विधी

  • विजया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्य देवाला अर्घ्यअर्पण करावे.
  • घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी. धूप-दीप लावून त्यांची आरती करावी.
  • पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा, तसेच विष्णूच्या स्तोत्रांचे पठण करा.
  • भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा.

विजया एकादशी व्रत कथा

Vijaya Ekadashi 2021 Date, Shubh Muhurat, Puja Vidhi and Significance

असे म्हणतात की, त्रेतायुगात भगवान श्रीराम लंकेवर आक्रमण करण्यासाठी समुद्रकिनारी पोहोचले होते, तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम यांनी समुद्र देवाला मार्ग देण्याची प्रार्थना केली होती, परंतु समुद्र देवताने श्रीरामांना लंकेला जाण्याचा मार्ग दिला नाही. त्यावेळी वक्दलाभ्य मुनींच्या आदेशाने श्रीरामाने विजय एकादशीचे व्रत केले, ज्याच्या प्रभावाने समुद्राने रामाला मार्ग दिला. यासोबतच विजया एकादशीचे व्रत रावणावर विजय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरले आणि तेव्हापासून या एकादशीला विजया एकादशी म्हणून ओळखले जाते.

- Advertisement -

 


हेही वाचा  :

आज आहे जया एकादशी; सुख-समृद्धीसाठी करा ‘हा’ उपाय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -