घरभक्ती... म्हणून शालिग्रामसोबतही केला जातो तुळशी विवाह; जाणून घ्या पूजेचे अगणित फायदे

… म्हणून शालिग्रामसोबतही केला जातो तुळशी विवाह; जाणून घ्या पूजेचे अगणित फायदे

Subscribe

शास्त्रामध्ये आणि धर्मामध्ये भगवान शालिग्राम यांची देखील पूजा करण्याचे महत्व सांगण्यात आले आहे. शालिग्रामला भगवान विष्णूंचे स्वरुप मानले जाते. ज्या घरामध्ये शालिग्राम वास करतात, तिथे त्यांची नियमीत पूजा केली जाते. हिंदू शास्त्रानुसार, कार्तिक शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला भगवान शालिग्राम यांची विशेष पूजा केली जाते. याचं कारण म्हणजे, या दिवशी भगवान शालिग्रामचा विवाह तुळशीसोबत केला जातो. हिंदू मान्यतेनुसार, घरामध्ये तुळशी विवाह केल्याने व्यक्तिला कन्यादान सारखे पुण्य प्राप्त होते. हिंदू धर्म ग्रंथ आणि वेदांमध्ये शालिग्राम भगवान यांची पूजा करण्याचे विशेष महत्व सांगिण्यात आले आहे.

शालिग्राम कुठे सापडतात?
शालिग्राम नेपाळमधील गंडकी नदीच्या तळाशी सापडतात. असं म्हणतात की, याची पूजा एकादषी आणि द्वादशीला केल्याने भगवान विष्णूंचा आर्शिवाद प्राप्त होतो.

- Advertisement -

शालिग्रामची पूजा करण्याचे आहेत अनेक फायदे?

- Advertisement -
  • शास्त्रामध्ये सांगण्यात आलंय की, तुळशी शिवाय शालिग्रामची पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केल्यास ते लवकर प्रसन्न होतात.
  • कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वादशीच्या दिवशी भगवान शालिग्राम यांचा विवाह तुळशीसोबत केल्याने त्या व्यक्तिच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात.
  • पुराणानुसार, ज्या घरामध्ये भगवान शालिग्राम स्थापन केले जातात तिथे भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मी देखील वास करतात.
  • शास्त्रामध्ये ज्या घरामध्ये भगवान शालिग्राम यांची दररोज पूजा केली जाते. तिथे वास्तु दोष आणि नकारात्मक ऊर्जा नाश पावते.

हेही वाचा :

मराठी रंगभूमी दीन ?… रंगकर्मींच्या चष्म्यातून…

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -