घरताज्या घडामोडीनाशिक रेल्वे स्थानकात हावडा एक्स्प्रेसच्या इंजिनला आग

नाशिक रेल्वे स्थानकात हावडा एक्स्प्रेसच्या इंजिनला आग

Subscribe

मध्य रेल्वेच्या नाशिक रोड रेल्वे स्थानकात हावडा एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागली आहे. रेल्वे स्थानकात हावडा एक्स्प्रेस उभी असताना अचानक इंजिनला आग लागली. आग लागल्याने नाशिक रोड रेल्वे स्थानकात प्रवाशां खोळंबा होत आहे.

मध्य रेल्वेच्या नाशिक रोड रेल्वे स्थानकात हावडा एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागली आहे. रेल्वे स्थानकात हावडा एक्स्प्रेस उभी असताना अचानक इंजिनला आग लागली. आग लागल्याने नाशिक रोड रेल्वे स्थानकात प्रवाशां खोळंबा होत आहे. (Howrah Express engine caught fire at Nashik railway station)

शनिवारी सकाळच्या सुमारास नाशिक रेल्वे स्थानकात हावडा एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच, शर्तीच्या प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. तसेच, रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

- Advertisement -

नाशिक-हावडा एक्स्प्रेसला आग लागली. मुंबईच्या दिशेने येत असताना नाशिक स्थानकात आग लागली. मात्र या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत कोणतीही जीवितहावनी झालेली नाही. मात्र इंजिनला आग लागल्याने रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लागल्याने नाशिक रोड स्थानकात बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.


हेही वाचा – गँगस्टर लंडा हरिकेने स्वीकारली सुधीर सुरी यांच्या हत्येची जबाबदारी, सोशल मीडियावर फेसबूक पोस्ट व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -