राशीभविष्य: शुक्रवार १२ ऑगस्ट २०२२

horoscope
राशीभविष्य

मेष : सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू नका. खर्च वाढेल.

वृषभ : रस्त्याने चालताना काळजी घ्या. घरातील वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ करावी लागेल.

मिथुन : आजचे होणारे काम उद्यासाठी ठेवू नका. सहलीचा बेत ठरवाल. स्पर्धेत जिंकाल.

कर्क : वादविवाद वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात समस्या येतील. नम्रपणे बोला.

सिंह : जुने लोक तुमच्यासाठी हिताची भूमिका घेतील. प्रतिष्ठा मिळेल. प्रेमात सावध राहा. खर्च वाढेल.

कन्या : धंद्यात जम बसेल. कायदा पाळा. अतिशयोक्तीपूर्ण वागू नका. प्रतिष्ठा मिळेल.

तूळ : तुमच्या कामाचे कौतुक होईल. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती होईल.

वृश्चिक : धंद्यात मेहनत घेतल्याचे समाधान मिळेल. तुमच्या मनाप्रमाणे कामे करता येतील. सौम्य धोरण ठेवा.

धनु : तुमची प्रगती होईल. खाण्याचे तंत्र नीट सांभाळा. जवळची व्यक्ती तुमचा फायदा घेईल. खर्च वाढेल.

मकर : क्षुल्लक कारणाने तुमचा वाद होऊ शकतो. महत्त्वाची व्यक्ती भेटणे कठीण होईल. खोटे प्रेम ओळखा.

कुंभ : मौजमजा कराल. आवडते पदार्थ मिळतील. निसर्गरम्य ठिकाणी मन रमेल. प्रतिष्ठा मिळेल.

मीन : कार्याला दिशा देण्यासाठी प्रयत्न करा. जुना वाद मिटवा. अरेरावी नको. प्रेमाने कामे करा.