मेष : घरात निर्माण झालेल्या प्रश्नावर उत्तर सापडेल. उत्साह देणारी बातमी कळेल. प्रेमातील गैरसमज दूर होईल.
वृषभ : प्रयत्नाने यश मोठे होईल. जुना वाद काढण्याची गरज नाही. आप्तेष्ठांची भेट होईल. धंद्यात नवे काम मिळेल.
मिथुन : मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल. त्यांच्या बद्दलची आनंदाची बातमी कळेल. जुने येणे वसूल करा.
कर्क : वाहन जपून चालवा. प्रकृतीकडे लक्ष द्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. वादविवाद जास्त वाढवू नये.
सिंह : कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील. संततीसंबंधी चिंता मिटेल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. धंदा वाढेल.
कन्या : कामात अडचणी येतील. सहकारी मदत करतील. वाहन जपून चालवा. घरातील खर्च वाढेल. मैत्रीत तणाव राहील.
तूळ : घरातील समस्या कमी करता येईल. मुलांकडून खूशखबर मिळेल. प्रवासाचा योग येईल. कला क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल.
वृश्चिक : जिद्द ठेवल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल, नावलौकिक वाढेल.
धनु : आप्तेष्ठांची भेट होईल. त्यांच्याकडून महत्त्वाची बातमी मिळेल. प्रवासाचा आनंद घेता येईल. धंद्यात यश मिळेल.
मकर : कामासंदर्भात प्रतिष्ठित व्यक्तीबरोबर चर्चा करता येईल. जुने येणे वसूल करा. घरातील अडचणी कमी होतील.
कुंभ : मनाची चंचलता होईल. कामाचे नियोजन करता येईल. जुने मित्र मंडळ भेटेल. व्यक्तींचा सहवास मिळेल.
मीन : मनाची अस्थिरता वाढेल. धंद्यात मतभेद होतील. तणाव वाढवू नका. शांत राहा. संयम बाळगा. वाहन जपून चालवा.