घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार 19 फेब्रुवारी 2024

राशीभविष्य : सोमवार 19 फेब्रुवारी 2024

Subscribe

मेष : मुलांनी सांगितलेला फंडा तुम्हाला चर्चेत उपयुक्त ठरू शकतो. जवळच्या माणसांना सांभाळून ठेवा.

वृषभ : विचारांना दिशा मिळेल. कठीण प्रश्न रेंगाळत ठेवू नका. वेळेला महत्त्व द्या. मैत्री वाढेल.

- Advertisement -

मिथुन : दुसर्‍यांना त्रास देणारा माणूस स्वार्थी वृत्तीचाच असतो. तुमचे काम पूर्ण होईल. धंदा वाढेल.

कर्क : मनाचा तोल सावरता येईल. मनमानी करण्यापेक्षा सत्यपरिस्थितीनुसार निर्णय घ्या.

- Advertisement -

सिंह : दडपण कमी होईल. वाहन जपून चालवा. नवीन ओळख होईल. धंद्यात लक्ष द्या. नवे काम मिळवा.

कन्या : तुमच्यावर आरोप येईल. शांतपणे विचार करा. प्रश्न मोठा असेल असे नाही. संयमी राहून मार्ग काढा.

तूळ : आप्तेष्ठांची भेट होईल. तुमचे बोलणे परिस्थितीला धरून असल्याने तुमचा प्रभाव वाढेल. नोकरीत बढती मिळेल.

वृश्चिक : विरोधात बोलणार्‍या माणसांच्यावर रागावण्यापेक्षा त्याचा खरोखर विचार करा. स्वतःमध्ये सुधारणा करा.

धनु : कामातील तणाव कमी होईल. मार्ग मिळेल. तुमचा सर्वांना अभिमान वाटेल. नवे परिचय होतील.

मकर : स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. तुमचा विचार चांगला असला तरी लोक टीका करतात. शांत राहा.

कुंभ : संसारात शुभ समाचार मिळेल. गैरसमज दूर होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. प्रवासात घाई करू नका.

मीन : अडचणीवर मात करून पुढे जावे लागेल. प्रेमाची माणसे तुमचा मान ठेवतील. खंबीर राहा. धंद्यात यश मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -