राशीभविष्य: २५ नोव्हेंबर,२०२१

horoscope
राशीभविष्य

मेष :- निराशा पदरी पडेल. तणाव व वाद वाढण्याची शक्यता निर्माण होईल. प्रेमात ताणतणाव वाढेल.

वृषभ :- मुलांची मदत उत्साहवर्धक राहील. व्यवसायात चांगला फायदा होण्यासाठी प्रयत्न करता येईल.

मिथुन :- वेळेवर पोहचण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तुमची परीक्षा पाहण्याचा वरिष्ठ विचार करतील.

कर्क :- अधिकारी मदत करतील. आर्थिक लाभ होईल. नवीन काम मिळेल.

सिंह :- गतिमान दिवस राहील. दर्जेदार व्यक्तींचा सहवास मिळेल. मनाची एकाग्रता होईल.

कन्या :- विचारांना चालना मिळेल. प्रेमात यश मिळेल. गैरसमज दूर करता येईल.

तूळ :- नाराजी व्यक्त करण्यात काही अर्थ नाही. मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. घाई नको.

वृश्चिक :- सर्वानुमते एखादा विचार पक्का करण्याचा प्रयत्न करता येईल. कुटुंबातील तणाव कमी करता येईल.

धनु :- नोकरीचा प्रश्न सुटण्याचे चिन्ह दिसेल. वरिष्ठ मदत करतील. नातलगांना मदत करावी लागेल.

मकर :- विरोधक मैत्रीची भाषा करतील. तुमच्याबद्दल आकर्षण वाढेल. धंदा तेजीत होईल.

कुंभ :- प्रकृती अस्थिर राहील. आप्तेष्ठांच्या सहवासाने मनावर दडपण येईल. आरोप होण्याची शक्यता आहे.

मीन :- लाभदायक घटना घडेल. प्रेमाची व्यक्ती भेटेल. व्यवसायातील अडचण भरून निघेल.