राशीभविष्य: गुरुवार ०२ मार्च २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- महत्त्वाकांक्षी वृत्तीनेच तुम्ही बुद्धी चालवू शकाल. मुलांचे हित साधता येईल. धंद्यात वाढ होईल.

वृषभ ः- घरातील वातावरण आनंदी राहील. तुमची समस्या सोडवण्यासाठी इतरांची मदत घेता येईल.

मिथुन ः- खंबीरपणे तुमचा मुद्दा मांडता येईल. तणाव होऊ शकतो. जवळचे लोक नाराज होऊ शकतात.

कर्क ः- तुमच्यावर आरोप टाकला जाईल. राग वाढेल. कायदा पाळा. वाहनापासून धोका संभवतो.

सिंह ः- परिस्थिती सावरून घेता येईल. आजच महत्त्वाचे काम करा. चर्चा मनाप्रमाणे होईल.

कन्या ः- तुमच्या कार्याला यश येईल. वाटाघाटीत फायदा होईल. विरोधकांना धडा शिकवाल.

तूळ ः- धंद्यात मोठा फायदा होईल. महत्त्वाची वस्तू नीट सांभाळा. अधिकार मिळेल.

वृश्चिक ः- तुमच्या मुद्याला विरोध झाला तरी मित्र मदत करतील. वाहन जपून चालवा. राग ताब्यात ठेवा.

धनु ः- आजचे काम आजच करा. तुमची हिंमत वाढेल. खाण्याची काळजी घ्या. आवडत्या व्यक्ती भेटतील.

मकर ः- नको असलेले कामसुद्धा प्रेमाने करावे लागते. तुम्ही बुद्धीने काम करा. वाहन जपून चालवा.

कुंभ ः- तुमच्या कामात क्षुल्लक अडचण येईल. आप्तेष्ठांना खूश ठेवावे लागेल. घर खरेदीचा विचार होईल.

मीन ः- नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. राग कमी करा. धंद्यात वाढ होईल. पैसा जपून ठेवा.