राशीभविष्यः गुरुवार १४ ऑक्टोबर २०२१

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- तुमची बाजू घेऊन कुणीतरी बोलेल. त्यामुळे तुमच्या मुद्यावर नव्याने चर्चा होऊ शकेल. अडचणी कमी होतील.

वृषभ :- जीवनसाथी, मुले तुमच्याकडे मागणी करतील. त्यांच्यासाठी तुम्हाला वेळ व पैसा खर्च करावा लागेल. कायदा पाळा.

मिथुन :- शुभ समाचार मिळेल. कामातील अडचणींवर उपाय शोधता येईल. विरोधकांचा डाव लक्षात येऊ शकतो.

कर्क :- मैत्री करण्यासाठी अपेक्षा नसलेली व्यक्ती येऊ शकते. वाहनाचा वेग कमी ठेवा. अनाठाई खर्च होऊ शकतो.

सिंह :- योजनेला गती मिळेल. तुमचा मुद्दा पटवून देता येईल. चूक सुधारता येईल. धंद्यात काम मिळवा. जिद्द ठेवा.

कन्या :- किरकोळ अडचण दूर होईल. यशासाठी थोडे थांबावे लागेल. स्पर्धेत कौतुक होईल. निर्णय घ्यावा लागेल.

तूळ :- कठीण काम होईल. ठरविलेली भेट घेता येईल. थोरा-मोठ्यांचा परिचय होईल. धंद्यात फायदा होईल.

वृश्चिक :- शेजारी उपयोगी पडेल. तुमच्या विचारांचे कौतुक होईल. खर्च करताना विचार करा. धंद्यात लक्ष द्या. फायदा होईल.

धनु :- मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करता येईल. कामाचा व्याप वाढेल. महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ येईल.

मकर :- .आज अचानक कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल. प्रवासात घाई करू नका.

कुंभ :- जुना विषय नव्याने मांडता येईल. तुमचा मुद्दा प्रभावी ठरेल. कल्पना कृतीत उतरवता येईल. सहकार्य मिळेल.

मीन :- .आई ही प्रेमाची मूर्ती असते. तिचा राग सुद्धा काळजीपोटीच असतो. तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल.