घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : गुरुवार 22 फेब्रुवारी 2024

राशीभविष्य : गुरुवार 22 फेब्रुवारी 2024

Subscribe

मेष – किरकोळ अडचणींमुळे तुमचे मन उदास होईल. चांगल्या कामामुळे समाजात मान मिळेल. नवीन ओळखी होतील. धंद्यात वाढ होईल.
वृषभ – आजचे काम उद्यासाठी ठेवू नका. तुमची कलात्मकता सर्वांच्या नजरेत भरेल. धंद्यात नवीन कामे मिळतील. घरातील खर्च वाढेल.
मिथुन – घरातील तणाव कमी होईल. नोकरीत वरिष्ठांच्या शब्दाला मानावे लागेल. चांगले काम करा. मैत्रीत व्यवहार कराल.
कर्क – कोर्टकेस जिंकाल. समाजात नावलौकिक वाढेल. कला क्षेत्रात मन रमेल. विशेष यश तुमच्या क्षेत्रात मिळवाल. येणे वसूल करा.
सिंह – व्यसनात वाहवत जाऊ नका. विरुद्धलिंगी व्यक्तीचा प्रभाव तुमच्यावर पडेल. जपून मैत्री करा. सौम्य राहा. कोर्टकेस लांबणीवर पडेल.
कन्या – महत्त्वाचे काम आजच करून घ्या. जुने मित्र भेटतील. मौज-मजेत वेळ खर्च होईल. कामात वरिष्ठ खूश होतील. बढती मिळेल.
तूळ – घरातील कामात तुमची धावपळ होईल. अपरिचित व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. महत्त्वाची वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा.
वृश्चिक – आजचे काम आजच करण्याचा प्रयत्न करा. आळस करू नका. उद्या कामे वाढण्याची शक्यता आहे. समाजात तुमचे वर्चस्व राहील.
धनु – कठोर बोलणे टाळल्यास तुमचा प्रभाव अधिक वाढेल. जुना वाद मिटवता येईल. नवीन ओळखी होतील. नवे मित्र जोडले जातील.
मकर – सहकार्‍यांकडून किचकट काम करून घेता येईल. समाजात मान-प्रतिष्ठा मिळेल. क्रीडा स्पर्धा जिंकाल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल.
कुंभ – नोकरीत कामाचा व्याप वाढेल. सहकार्‍यांची मदत करतील. वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी देतील. ती व्यवस्थित पार पाडा.
मीन – तुमच्या कामाला गती मिळेल. कलाक्षेत्रात प्रगती कराल. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. कल्पना कृतीत उतरवता येईल. धंदा वाढेल. नवे काम मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -