घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार १३ मार्च २०२४

राशीभविष्य : बुधवार १३ मार्च २०२४

Subscribe

मेष – कामात उत्साही वातावरण राहील. घरात क्षुल्लक वाद संभवतो. महत्त्वाच्या वस्तू वेळेवर सापडणे कठीण होईल.
वृषभ – जुने मित्र भेटतील. राजकीय क्षेत्रातील चर्चा सफल होईल. कला क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक लाभ संभवतो.
मिथुन – व्यवसायात व नोकरीत उत्साहवर्धक वातावरण राहील. नव्या विचाराने प्रेरित व्हाल. प्रेमात सावध राहा.
कर्क – द्विधा विचारांनी ग्रासले जाल. घरगुती तणाव कमी होईल. कला-क्रीडा स्पर्धेसाठी जिद्द ठेवावी लागेल. यश मिळेल.
सिंह – मान-सन्मान मिळविण्यासाठी भांडण केल्यास गैरसमज वाढेल. वाहन जपून चालवा. मूल्यवान वस्तू सांभाळा.
कन्या – कुटुंबाबरोबर वेळ मजेत जाईल. अधिष्ठांच्या भेटीने आनंद मिळेल. धंद्याची दिशा मिळेल. नोकरीत बढती मिळेल.
तूळ – व्यवसायातील महत्त्वाचा धागा हाती लागेल. विचारांची देवाण-घेवाण करताना शब्द जपून वापरा. संततीचा आधार वाटेल.
वृश्चिक – आत्मविश्वासाने एखादा निर्णय घेता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. मित्र-परिवार वाढेल.
धनु – सामाजिक कार्यात धावपळ व दगदग होईल. खाण्या-पिण्याची चंगळ होईल. वाहन जपून चालवा. आर्थिक लाभ होईल.
मकर – जीवनसाथीचा आधार व ध्येय महत्त्वाचे वाटेल. नव्या विचारांचा उपयोग करून घेण्यात यशस्वी व्हाल. यश मिळेल.
कुंभ – गैरसमज व तणाव संभवतो. प्रतिष्ठेवर टीका केली जाईल. संयम बाळगा. तुमचा मोठेपणा इतरांना सहन होणार नाही.
मीन – प्रवासाचा बेत ठरवाल. व्यवसायात सुधारणा होईल. नोकरवर्गाची नाराजी दूर करा. शेजारी मदत करेल. प्रतिष्ठा टिकवता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -