राशीभविष्य: सोमवार २७ फेब्रुवारी २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : तुम्ही ठरविल्याप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. प्रेमाने प्रश्न सोडवा. जबाबदारी स्वीकारावी लागेल.

वृषभ : महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. घरातील वाद चव्हाट्यावर येऊ शकतो. डोळ्यांची काळजी घ्या.

मिथुन : आजचे काम उद्यावर टाकू नका. मेहनतीचे फळ चांगलेच मिळेल. वरिष्ठांना दुखवू नका.

कर्क : रागावर नियंत्रण ठेवल्यास सर्व कामे नीट पूर्ण करू शकाल. धंद्यात गोड बोला. गिर्‍हाईक सांभाळता येईल.

सिंह : मुलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न कराल. नोकरीतील तणाव कमी होईल. घरात आनंदीपणा राहील.

कन्या : धावपळ, दगदग नातलगांच्यासाठी करावी लागेल. अधिकार प्राप्तीसाठी आश्वासन राहील.

तूळ : घरातील कामे होतील. भेटीत यश मिळेल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल.

वृश्चिक : प्रवासात घाई करू नका. सौम्य धोरण ठेवा. मोठ्या लोकांची मदत घेता येईल.

धनु : आजचे काम उद्यावर टाकू नका. वरिष्ठांचा राग समजून त्याप्रमाणे वागता येईल. धंद्यात तेजी येईल.

मकर : आपले पणाची भावना निर्माण झालेल्या माणसांची मैत्री दृढ होईल. धंद्यात नवा पर्याय शोधता येईल.

कुंभ : जुने मित्र भेटतील. थकबाकी वसूल होईल. धंद्यात चांगला जम बसेल. खरेदी कराल.

मीन : कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. प्रतिष्ठा वाढेल. उद्योगात नवा मार्ग मिळेल. पैसा साठवून ठेवा.