Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आहार भान - दिवाळी स्पेशल: जीरा पुरी

आहार भान – दिवाळी स्पेशल: जीरा पुरी

Related Story

- Advertisement -

पहाटे पहाटे पडणारी गुलाबी थंडी दिवाळीची वर्दी देते. चकली, लाडू, करंजी, चिवडा फराळाचे ताट कसे मनाला मोहवते. त्याकडे पाठ फिरवणे शक्य नाही, पण खाल्ल्यावर त्रास होतो त्याचे काय? त्यासाठी ह्या काही सूचना..

१. दिवाळी हा मोठा उत्सव. त्यातील सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा. घराची साफसफाई, दुकानातून साहित्य मागवणे, मेनुची चर्चा, पदार्थ करताना दरवळणारा सुगंध. मन प्रसन्न असले की शरीरही तंदुरुस्त राहते.

- Advertisement -

२. मोजके २-३ पदार्थ थोडे थोडे खावेत. तसे पाहिले तर पहिला आणि शेवटचा घासाची चवच आपल्या मेंदूत जाणवते. मधले घास फक्त पोटभरीचा माल.

३. बाहेरच्या मिठाया तर कटाक्षाने टाळाव्यात.

- Advertisement -

४. फराळ झाल्यावर नेहमी थोडे गरम पाणी प्यावे. वृद्ध माणसे आणि रुग्णांना जर घशात खवखव जाणवली तर थोडे मध हळदीचे चाटण घ्यावे.

५. सकाळी किंवा दुपारी फराळ खाल्ल्यावर निदान रात्रीचे जेवण तरी साधे घ्यावे. भाजी भाकरी किंवा खिचडी. दिवसभर जर जाड अन्न खाल्ले तर नंतर त्रास होऊ शकतो.

६. आपण घरी शुद्ध तेल, चांगल्या प्रतीचे साहित्य वापरून पदार्थ बनवू शकतो. बाहेरचे पदार्थ कुठल्या तेलात बनवले असतील याची खात्री देऊ शकत नाही. असे पदार्थ खाऊन घशाला खवखव, खोकला, पोटाला त्रास होऊ शकतो म्हणून शक्यतो घरी बनवलेले पदार्थ खावेत. मोजकेच २-३ पदार्थ करावेत.

७. तळण्यासाठी तेच तेच तेल परत घेऊ नये.

आज आपण बनवूया जीरा पुरी

साहित्य –

 • गहू पीठ – १ वाटी
 • मैदा – १ वाटी
 • भरड कुटलेले जिरे – पाव वाटी
 • हिंग – छोटा अर्धा चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तळण्यासाठी तेल

कृती –

 • एका परातीत गव्हाचे पीठ आणि मैदा एकत्र करा.
 • त्यात भरड कुटलेले जिरे, मीठ आणि हिंग घालून मिक्स करा.
 • एका कढईत तेल तापत ठेवा. तेल कडकडीत तापले की दोन चमचे तेल वरील पिठात घाला म्हणजे पुऱ्या चांगली कुरकुरीत होतात.
 • अलगद मिक्स करा.
 • थोडे थोडे पाणी घालून पीठ मळा. जमेल तेवढे घट्ट मळा. १५ मिनिटे झाकून ठेवा.
 • छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या. प्रत्येक पुरीला सुरीने २-४ लहान लहान टोचे मारा म्हणजे पुऱ्या फुगणार नाहीत. पुऱ्या फुगल्या की नरम पडतात. हवाबंद डब्यात ठेवा.

डॉ. ऋजुता पाटील कुशलकर
[email protected]

- Advertisement -