घरलाईफस्टाईलटोमॅटो स्टोअर करण्याच्या 'या' सोप्या ट्रिक्स नक्की ट्राय करा; फ्रिजचीही गरज नाही

टोमॅटो स्टोअर करण्याच्या ‘या’ सोप्या ट्रिक्स नक्की ट्राय करा; फ्रिजचीही गरज नाही

Subscribe

टोमॅटो अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी 'या' काही सोप्या ट्रिक्स नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील. काय आहेत या सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया.

भाज्या किंवा कोणतेही अन्न पदार्थ हे नाशवंत असतात म्हणजेच ते जास्त काळ टिकत नाहीत ठराविक काळापर्यंतच वापरेल जाऊ शकतात. प्रामुख्याने उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंमध्ये भाज्या लवकर खराब होतात. प्रत्येक घरातच टोमॅटोचा वापर केला जातो. रोजच्या स्वयंपाकात किंवा सॅलेड मध्ये रोजच टोमॅटो पवारला जातो.टोमॅटो हा शारीसाठी युद्ध उत्तम असतो. टोमॅटोचे अनेक गुणधर्म सुद्धा असतात. बाहेरील वातावरणामुळे टोमॅटो केव्हा केव्हा लवकर खराब होतात. पण अश्यावेळी फ्रिज मध्ये न ठेवता ही टोमॅटो जास्त वेळ टिकवून ठेवता येतात.

टोमॅटो अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी ‘या’ काही सोप्या ट्रिक्स नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील. काय आहेत या सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया.

- Advertisement -

हे ही वाचा – घरी लावलेलं दही आंबट होतंय? ‘या’ सोप्या टिप्स नक्की ट्राय करा

टोमॅटो उघड्या भांड्यात ठेवा

- Advertisement -

एखाद्या उघड्या कंटेनर मध्ये म्हणेजच झाकण न लावता तुम्ही कंटेनर त्यात ठेऊ शकता. त्यामुळे टोमॅटोला मोकळा वारा मिळेल. टोमॅटो कंटेनर मध्ये ठेवताना ते स्वच्छ धुवून कोरडे करून मगच ठेवावेत. त्याचबरोबर कंटेनर वेळोवेळी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात सुद्धा ठेवा. त्यामुळे कंटेनरमध्ये टोमॅटो अधिक काळ सुरक्षित राहतील.

Tomato

हे ही वाचा – पावसाळ्यात नेहमीचीच भजी खाऊन कंटाळा आलाय मग नक्की ट्राय करा या हटके रेसिपी

टोमॅटो साठविण्यासाठी मातीचा वापर करा

टोमॅटो साठविण्यासाठी मातीचाही पवार केला जातो टोमॅटो साठविण्याचे भांडे धुवून स्वच्छ करून कोरडे करून करून घ्यावे. आणि मगच त्यात माती भरावी आणि त्यात टोमॅटो पूर्ण झाकले जातील असे ठेवा. टोमॅटो मातीत ठेवताना पूर्ण कोरडे असले पाहिजेत. त्यामुळे फ्रिजचा वापर न करता टोमॅटो अधिक काळ टिकू शकतात त्याच बरोबर मातीतील नैसर्गिक तत्वे सुद्धा त्यात उतरतील.

प्लास्टिक कंटेनरचा वापर करा

खूप वेळा लोक टोमॅटो स्वयंपाकघरात साठवून ठेवतात. त्यामुळे टोमॅटो लवकर खराब होण्याची शक्यता असते. स्वयंपाकघरातील उष्णतेमुळे टोमॅटो लवकर खराब होतात. त्यामुळे टोमॅटो साठवण्यासाठी आणि ते अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर करता येऊ शकतो. यासाठी टोमॅटो चांगले कोरडे करून घ्या हवा खेळती राहील अशा प्लास्टिकच्या डब्यात भरून घरातील गारवा असलेल्या ठिकाणी ठेवा. यामुळे टोमॅटो लवकर खराब होणार नाहीत.

हे ही वाचा – बाबो, पिज्जा खाल्याने 7.8 मिनिट आयुष्य होते कमी, मात्र ‘हे’ पदार्थही आहेत घातक

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -