घरताज्या घडामोडीकैरी खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास होते मदत

कैरी खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास होते मदत

Subscribe

उन्हाळ्यात कैरी म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटते. कैरीचे अनेक प्रकार आपण करत असतो. कैरीची चटणी, लोणचे, पन्हे असं सर्व काही करत असतो. या आंबट आणि गोड कैरीचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

  • सध्याच्या दिवसात रोगप्रतिकार शक्ती वाढणे फार गरजेचे आहे. कैरीत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते आहे.
  • कैरीचे सेवन करणे डोळ्यांसाठी सुद्धा फायदेशीर असते.
  • कैरी नियमित खाल्ल्याने आपले केस काळेभोर राहतात आणि आपली त्वचा तजेलदार आणि मऊ होऊन त्वचा टवटवीत राहते.
  • ज्या लोकांना अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारखे त्रास होत असतील तर कैरीचे सेवन करणे फायदेशीर असते.
  • बद्धकोष्ठता आणि पोट्याच्या सर्व तक्रारी आणि विकारांवर कैरी उपायकारक असते.
  • मधुमेह असलेल्या व्यक्तींनी कैरीचे सेवन केल्याने आपल्या शरीरामधील साखरेच्या पातळीला कमी करण्यास मदत होते.
  • कैरीमुळे आपल्या शरीरामधील लोह पुरवठा पूर्ण करू शकता.
  • जर तुम्हाला जास्त घाम येत असेल तर कैरीचे पन्हे किंवा कैरी खा. यामुळे या त्रासापासून आराम मिळतो.
  • रक्तविकार टाळण्यासाठी कैरीचे सेवन केले पाहिजे.
  • उलटी होणे किंवा जीव घाबरणे असा त्रास होत असल्यास कैरी आणि पादेलोण घेतल्याने या त्रासांपासून लगेच आराम मिळतो.

हेही वाचा – आंब्याचे सेवन जास्त करताय तर सावधान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -