Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE coronavirus: कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर 'या' अवयवांनाही करतोय निकामी

coronavirus: कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर ‘या’ अवयवांनाही करतोय निकामी

Related Story

- Advertisement -

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णांमध्ये नवनवीन लक्षण दिसून येत आहेत. दरम्यान हा विषाणू केवळ आपल्या फुफ्फुसांवरच नाही तर शरीराच्या इतर अवयवांवरही गंभीर परिणाम करत असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हा घातक कोरोना विषाणू शरीरावर हल्ला करत रोगप्रतिकार शक्ती कमी करतो. तसेच शरीरातील इतर अवयवांवरही सूज येण्यास सुरुवात होते. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणासारखे आजार असणाऱ्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो. अशा परिस्थित कोरोना संसर्ग झाल्यास सर्व लक्षणांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. तसेच शरीरात होणार्‍या कोणत्याही बदलांकडे दुर्लक्ष करू नका. दरम्यान कोरोना संसर्ग झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि काय परिणाम होते हे जाणून घेऊ या…

ह्रदयावर गंभीर परिणाम

ज्या रुग्णांना आधीच ह्रदयासंबंधीत  किंवा पचनक्रियेसंंबंधीत आजार आहेत अशा लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो. SARs-COV-2 व्हायरसमुळे कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांचा ह्रदयातील स्नायूंमध्ये सूज येते.

हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशनचा अभ्यास

- Advertisement -

हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशनच्या म्हणण्यानुसार, ‘कोरोनाचा गंभीर लक्षणांनंतर रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी जवळपास एक चतुर्थांश रुग्णांना हृदयविकाराचा त्रास असल्याचे दिसून आले. यापैकी जवळपास एक तृतीयांश लोकांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार असल्याचे समोर आले. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये असामान्य हृदय गती, हृदयाचे ठोके वाढणे, छातीत दुखणे आणि थकवा यासारखे लक्षणे वारंवार दिसतात.

न्यूरोलॉजिकल समस्या

मागील काही अहवालांनुसार, कोरोना रूग्णांमध्ये मानसिक अस्वस्थता, विसरभोळेपणा, चक्कर, डोकेदुखी, आणि दृष्टीदोष सारख्या समस्या आढळतात. जामा न्यूरोलॉजिलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, चीनच्या वुहान राज्यात रुग्णालयांमध्ये २१४ मधील एक तृतीअंश कोरोनाबाधितांमध्ये न्यूरोलॉजिक आजाराची लक्षणे आढळत असून स्ट्रोकची गंभीर समस्या निर्माण होत आहे. कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना बराच काळ कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. यामुळे अनेक रुग्णांना अल्जाइमर आणि पार्किंसनसारखे आजार होतात.

मूत्रपिंड खराब होऊ शकते

- Advertisement -

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये किडनीसंबंधित गंभीर आजार वाढत आहेत. SARS-CoV-2 विषाणू शरारीतील पेशींना संक्रमित करते. त्यामुळे हा विषाणू स्पाइक प्रोटीन ACE2 रिसेप्टर्सच्या संपर्कात येतो. यामुळे मूत्रपिंडासह अनेक अवयवांच्या पेशी संक्रमित होतात. विषाणू मूत्रपिंडापर्यंत पोहोचल्यानंतर गंभीर परिणाम करतो. यामुळे रुग्णास युरिन करताना अनेक अडचणी येतात तसेच यूरिनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतरही मूत्रपिंड योग्यप्रकारे कार्य करत नाहीत.

रक्तात गुठळ्या होतात

बऱ्याच कोरोनाबाधित रुग्णांचा शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत आहेत. यामागील नेमक्या कारणांवर अभ्यास सुरु आहे. तज्ज्ञांचा मते, कोरोना विषाणू रक्तवाहिन्यांवर दबाव आणतो. यामुळे तयार होणारे प्रथिनांमुळे शरारीत रक्त जमा होते. दरम्यान रक्ताचा गुठळ्या केवळ फुफ्फुसातच दिसली नाहीत तर पायांच्या आणि शरीराच्या इतर भागामध्ये देखील दिसल्या आहेत.

कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम

कोरोना विषाणू एकाचवेळी शरीरातील विविध अवयवांवर परिणाम करत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होण्यासाठी रुग्णास बराच वेळ लागत आहे. हा विषाणू केवळ फुफ्फुसांवरच नव्हे तर हृदय आणि मेंदूवरही परिणाम करतो. यामुळे आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो.


 

- Advertisement -