घरलाईफस्टाईलघरीच्या घरी दहा मिनिटात बनवा स्ट्रॉबेरी मिल्कशेक

घरीच्या घरी दहा मिनिटात बनवा स्ट्रॉबेरी मिल्कशेक

Subscribe

हिवाळ्याच्या दिवसात बाजारात स्टॉबेरी सहज मिळते. चवीला आंबट गोड असलेली स्ट्रॉबेरी लहान मुलांना प्रिय आहे. बच्चेकंपनीला स्ट्रॉबेरी मिल्कशेक फार आवडतो. घरातल्या घरात केवळ १० मिनिटात हा मिल्कशेक बनवता येतो.

साहीत्य- १ कप स्ट्रॉबेरी, १ कप थंड दूध, ५ चमचे साखर.

- Advertisement -

कृती- सर्वात आधी मिक्सरच्या जारमध्ये फ्रेश स्ट्रॉबेरी टाका. त्यात ५ चमचे साखर टाका आणि पल्प तयार करा. नंतर एका ग्लासात हा पल्प टाका. त्यावर थंड दूध टाका दोन चमचे साखर टाकून मिक्स करून घ्या. त्यात मिल्कशेक तयार झाला की स्ट्रॉबेरीचे तुकडे टाकून ग्लास सजवा. तुम्हांला आवडत असल्यास यात तुम्ही व्हॅनिला किंवा स्ट्रॉबेरी आईस्क्रीम टाकू शकता. बर्थडे पार्टी, गेट टुगेदर किंवा घरातील कार्यक्रमातही हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवावा. बच्चेकंपनीबरोबरच मोठी मंडळींनाही हा मिल्कशेक नक्की आवडेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -