Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी दुधी भोपळ्याचे पराठे

दुधी भोपळ्याचे पराठे

Related Story

- Advertisement -

सध्याच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी आपला आहार सकस ठेवणे गरजेचे आहे. पण बऱ्याचवेळा घरातील त्याच त्याच भाज्या आणि त्याच चवीचे पदार्थ खाऊन मुलं कंटाळतात. त्यातही दुधी भोपळा ही फळभाजी मुलांना फार आवडत नाही. पण आरोग्यासाठी सर्व भाज्या खाणे आवश्यक आहे. यामुळे महिलांनी थोडी कल्पकता वापरून मुलांना न आवडणारी भाजी आवडती बनवण्यासाठी स्वयंपाकात कल्पकता वापरणे गरजेचे आहे. याच उद्देश्याने आम्ही दुधीचे पराठे ही रेसिपी आणली आहे.

साहित्य

- Advertisement -

एक वाटी दुधी भोपळ्याचा किस, दोन वाटी गव्हाचे पीठ, दोन चमचे आलं लसूण पेस्ट, चवीनुसार तिखट, हळद, एक चमचा हळद, एक चमचा गरम मसाला, एक चमचा धने पावडर, एक चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी दही, तूप

कृती

- Advertisement -

एका पसरट पातेल्यात दुधीचा किस घ्यावा. त्यात गव्हाचे पीठ, तिखट, मीठ, हळद, धने-जिरे पावडर, आलं लसून पेस्ट, दही टाकून मळून घ्या. पोळपाटावर जाडसर पराठे लाटून घ्या. गॅसवर मंद आचेवर तवा गरम करावा, तूप टाकून पराठे खरपूस भाजावेत. सॉस किंवा चटनी किंवा दह्याबरोबर दुधी पराठे मस्त लागतात.


हेही वाचा – प्रोटीनयुक्त सोयाबीन मटर पुलाव


 

- Advertisement -