घरताज्या घडामोडीमिक्स व्हेज 'मूगाच्या' डाळीचे सूप

मिक्स व्हेज ‘मूगाच्या’ डाळीचे सूप

Subscribe

पचायला हलकं आणि तब्येतीसाठी उत्तम असे हे मिक्स व्हेज मूगाच्या डाळीचे सूप पौष्टीक असते. आजारी किंवा सामान्य व्यक्तींनी हे सूप आठवड्यातून चार पाच वेळा तरी आवर्जून प्यावे. डाळी आणि भाज्यांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन्समुळे शरीराला उर्जा मिळतो.

साहित्य

- Advertisement -
  • पाव कप धुतलेली मूग डाळ
  • १ कप जाडसर चिरलेला कांदा
  • १ कप बटाट्याचे तुकडेदा
  • १ मोठा चमचा चिरलेला कोबी
  • १ मोठा चमचा चिरलेले गाजर
  • १ चमचा अमूल बटर
  • चवीनुसार काळी मिरी पावडर
  • एक चमचा लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ

कृती

कुकरमध्ये बटर टाकून गरम करून घ्या. त्यात कांदा टाका. नंतर त्यात बटाटे टाकून नीट परतून घ्या. डाळ, मीठ आणि ४ कप पाणी टाका. कुकरच्या चार पाच शिट्या घ्या. कुकर थंड झाल्यानंतर त्यात गाजर आणि कोबी शिजवून घ्या. गॅस बंद करून या सूपमध्ये लिंबाचा रस आणि काळी मिरी पावडर टाका. गरमागरम सूप तयार.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -