Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी पनीरचे कटलेट

पनीरचे कटलेट

Related Story

- Advertisement -

कटलेट हा असा खाद्य पदार्थ आहे जो तुम्ही केव्हाही आणि कुठेही खाऊ शकता. मिक्स व्हेज कटलेट, फिश कटलेट, चिकन कटलेट बाजारात मिळतात. पण आज आपण पनीरपासून कटलेट कसे बनवायचे ते बघणार आहोत.

साहित्य

- Advertisement -

किसलेले २०० ग्रॅम पनीर, ३ चमचे ब्रेडचा चुरा, २ चमचे मैदा, ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, अर्धा कप धने पावडर, मीठ चवीनुसार, ३ चमचे दही, कॉर्न फ्लॉवर

कृती

- Advertisement -

एका बाऊलमध्ये किसलेले पनीर, मैदा, तिखट, मीठ, धने पावडर,टाकून मिक्स करून घ्या. पंधरा मिनिटं ते तसेच ठेवा. कुकी कटर असेल तर त्यात हे मिश्रण भरा. नंतर कॉर्नफ्लॉवर मध्ये बुडवा व फ्राय पॅनवर कमी तेलात तळू घ्या. लालसर झाले की टिश्यू पेपरवर ठेवा. सॉसबरोबर छान लागतात. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात कटलेट सहज बनवता येतात.


- Advertisement -