घरताज्या घडामोडीझेंडूचा चहा प्या, रिफ्रेश व्हा

झेंडूचा चहा प्या, रिफ्रेश व्हा

Subscribe

झेंडूच्या फुलांच्या चहामुळे मनावरील ताण कमी होतो

हिंदू धर्मात कोणताही सण असो त्या दिवशी सजावटीसाठी किंवा देवाच्या पूजेसाठी झेंडूची फुले ही आणली जातात. प्रत्येक सणाला झेंडूंच्या फुलांना एक महत्त्वाचे स्थान आहे. फुलांची सजावट ही झेंडूंच्या फुलांशिवाय पूर्णच होऊच शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का झेंडूची फुले ही केवळ देवाला वाहण्यासाठी किंवा सुशोभनासाठी नाही तर झेंडूच्या फुलांचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. आपण पाहिले तर आयुर्वेदातही झेंडूच्या फुलांचे फायदे सांगितले आहेत. त्याचप्रमाणे मनावरील ताण,थकवा, घावण्यासाठी देखील झेंडूच्या फुलांचा मोठा फायदा होतो. झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्याने आपल्याला रिफ्रेश वाटते त्यामुळे झेंडूच्या फुलांचा असाही एक उपयोग करता येतो. जाणून घ्या झेंडूच्या फुलांच्या चहाचे फायदे काय आहेत?आणि चहा कसा बनवायचा?

झेंडूच्या फुलांचा चहा कसा बनवायचा?

झेंडूच्या फुलांचा चहा तयार करण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घ्या पाणी उकळल्यावर त्यात झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाका. एक ग्लास गरम पाण्यासाठी ३-४ टेबल स्पून झेंडूच्या पाकळ्या टाकू शकता. पाणी व्यवस्थित उकळल्यावर झेंडूच्या पाकळ्यांचा रंग पाण्यात उतरेल. त्यानंतर गॅस बंद करुन पाणी गाळून घ्या आणि त्यात मध टाका. अशाप्रकारे झेंडूच्या फुलाचा रिफ्रेश करणारा चहा तयार होईल.

- Advertisement -

झेंडूच्या फुलांच्या चहाचे फायदे

झेंडूच्या फुलांच्या चहामुळे मनावरील ताण कमी होतो. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी देखील या चहाचा उपयोग होतो. दात दुखत असल्यास झेंडूच्या फुलांचा चहा प्यावा किंवा त्याने गुळणा कराव्या. तसेच झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यास अंगावर आलेली सूज देखील कमी होण्यास मदत होते. मात्र झेंडूच्या फुलांचा चहा तयार करत असताना झेंडूची फुले ताजी असतील या काळजी घ्या. तसेच झेंडूच्या पाकळ्या पाण्यात टाकण्याआधी त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.


हेही वाचा – सीताफळ खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -