घरलाईफस्टाईलशिक्षणाबरोबर करा 'हे' part-time जॉब

शिक्षणाबरोबर करा ‘हे’ part-time जॉब

Subscribe

सध्याची तरुण मंडळी ही स्वावलंबी होण्यासाठी कॉलेजच्या दिवसातच एखादा पार्ट टाइम जॉब पाहतात. जेणेकरुन प्रत्येकवेळी त्यांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी घरातील मंडळींपुढे हात पसरायला नको असे त्यांना वाटत असते. सेल्फ डिपेंडेट बनण्यासाठी ते याच गोष्टीपासून सुरुवात करतात. लहान मोठ्या गोष्टी त्या स्वत:च्याच पैशांनी खरेदी करतात.

अशातच तुम्ही सुद्धा शिक्षणासोबत पार्ट टाइम जॉब करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे यासाठी खुप ऑप्शन आहेत. याच्यामाध्यमातून तुम्ही पैसे सुद्धा कमावू शकता.

- Advertisement -

-डेटा एन्ट्री ऑपरेटर


आजकाल बहुतां कॉलेज विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप किंवा कंप्युटर असते. हे काम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करता येते. हे काम तुम्हाला एखाद्या कागदपत्रांची किंवा डेटाबेसच्या माहितीवर आधारित असते.

- Advertisement -

-प्रोडक्ट रिसेलिंग


यामध्ये तुम्ही प्रोडक्शन अथवा किरकोळ विक्रेत्याकडून काही माल खरेदी करुन तो ग्राहकांना विक्री करु शकता. यामध्ये तुम्हाला काही प्रमाणात नफा सुद्धा होतो. विक्रीसाठी तुम्ही ट्रेडिशनल किंवा इंटरनेटच्या माध्यमाचा वापर करु शकता.

ब्लॉगिंग


जर तुम्हाला लिहण्याची आवड असेल तर तुम्ही ब्लॉग लिहू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे आर्टिकल्स एखाद्या मीडिया कंपनीला फ्रिलान्सच्या रुपात पाठवून पैसे कमावू शकता.

-वेब डेवलपर


यासाठी तुम्हाला वेबसाइट तयार करणे अथवा कोडिंग शिकावे लागेल. त्यानंतरच तुम्ही एखाद्या कंपनीत किंवा संस्थेसाठी वेब बनवून पैसे कमावू शकता.

-ग्राफिक डिझाइनिंग


कोरल आणि इलेस्ट्रेटर सारखे सॉफ्टवेअर शिकून तुम्ही ग्राफिक डिझाइनिंग सुद्धा करु शकता. हे काम तु्म्ही घरबसल्या सुद्धा करु शकता.

-फोटोग्राफी


जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही हे पार्ट टाइम प्रोफेशन म्हणून निवडू शकता.

-डिजिटल मार्केटिंग


यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकावे लागेल. त्यानंतरच तुम्ही कंपनीसाठी डिजिटल मार्केटिंगसाठी काम करु शकता.


हे देखील वाचा- सैल, सुती कपड्यांना तरुणाईची पसंती; २० ते २५ टक्क्यांनी वाढली मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -