Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र "खारघरसारख्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करायचे का?" मुनगंटीवारांचा विरोधकांना सवाल

“खारघरसारख्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करायचे का?” मुनगंटीवारांचा विरोधकांना सवाल

Subscribe

मुंबई | “खारघरसारख्य दुर्दैवी घटनेचे राजकारण कारायचे का?”, असा सवाल राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar) यांनी विरोधकांना केला आहे. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा कार्यक्रम नवी मुंबईतील खारघर येथे १६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची वेळ दुपारीची ठेवण्यात आली होती. या कार्यकर्मात श्रीसदस्य हे भर उन्हात बसले होते. यामुळे १६ श्रीसदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या खारघर दुर्घटनेवरून (Kharghar sunstroke) विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. महाराष्ट्र भूषणने (Maharashtra Bhushan) गौरविण्यात आलेले आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासह आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्ययालयता दाखल करण्यात आली. यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाने दिलेल्या मुलाखतीतून विरोधकांवर टीका केली.

महाराष्ट्र भूषण मिळालेले आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला व्हावा, या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “या याचिकेच्या माध्यमातून राजकारण केले जात आहेत. सत्तेच्या स्वार्थापोटी खारघर दुर्दैवी घटनेचे भांडवल करून राजकारण केले जात आहेत. या याचिकेतून वादविवाद, बाजू मांडली जाईल, यानंतर हे सर्व स्पष्ट होईल. ही घटना दुखदायक आणि दुर्दैवी आहेत. या दुर्दैवी घटनेवर राजकारण करण्यापूर्वी माहिती घ्याची नाही. जेव्हा तुम्ही विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य असता. तेव्हा तुम्ही सर्व गोष्टींची माहिती घ्यावी. या कार्यक्रमाचे नियोजन कसे केले होते, नियोजनाची पुस्तिका कशी होती. या कार्यक्रमासाठी स्वत:मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि पत्नी हे देखील श्रीसदस्यांसोबत उन्हात बसले होते. एखादी दुर्दैवी घटना झाली त्यातून राजकारण करायचे का?,” असा सवाल त्यांनी विरोधकांना केला आहे.

- Advertisement -

इमारत पडल्यानंतर मुंबई महापालिकेवर गुन्हा दाखल करत नाही

या दुर्दैवी घटनेची कोणतीतरी जबाबदारी घेतली पाहिजे, असा सवाल केल्यावर मुनगंटीवार म्हणाले, “काही घटना या नैसर्गिक असतात. मुंबई शहरातील इमारती पडतात. तेव्हा आपण काय मुंबई महापालिकेवर गुन्हे दाखल करत नाही ना. नैसर्गिक घटनांचे राजकारण करणे टाळले पाहिजे. परंतु, इमारत दुर्घटना आणि खारघर दुर्घटनेची मी तुलना करत नाही”, असे त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

खोटे मेसेज पसरविले जातात

राज्य सरकारने उष्माघाताने झालेल्या श्रीसदस्यांच्या मृत्यूचा आकडा लपवला आहे, या प्रश्नावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, “काही लोक असे खोटे मेसेज पसरवत आहेत. यातून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. परंतु, मृत्यूचा आकडा माहिती नसताना खोटा आकडा का सांगितला जातोय ते मला ही माहिती नाही. पण, मी मंत्री म्हणून ऐवढेच सांगू इच्छितो की, १४ मृत्यूंची नोंद झालेली आहे आणि उष्माघाताने त्रास झालेल्या रुग्णांचा नेमका आकडा सध्या माहिती नाही आणि याबद्दल मी माहिती घेऊन सांगू.”

 

- Advertisment -