घरमहाराष्ट्ररिफायनरीचा प्रोजेक्ट रेटून नेण्यासाठी शिंदे सरकारमार्फत दमनशाही - विनायक राऊत

रिफायनरीचा प्रोजेक्ट रेटून नेण्यासाठी शिंदे सरकारमार्फत दमनशाही – विनायक राऊत

Subscribe

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू या ठिकाणी रिफायनरी विरोधात स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन केले जात आहे. यावेळी आंदोलन करणाऱ्या काही महिलांना अटक देखील करण्यात आली आहे आणि माध्यमांना या ठिकाणी जाण्यास देखील पोलिसांकडून बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता माध्यमांनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनाही बारसूला जाण्यापासून पोलिसांनी अडवणूक केली आहे. रानतळे चेकपोस्टवर खासदार विनायक राऊत यांची गाडी अडवण्यात आली. बारसू येथे कलम १४४ लागू केल्यामुळे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

विनायक राऊत  म्हणाले की, भूमीपुत्रांचा आणि कोकणी माणसाचा आवाज दाबण्यासाठी या ठिकाणी पोलिसांची छावणी उभी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा सोडून एसपी साहेब सुद्धा या ठिकाणी तळ ठोकून बसले आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर नेमके कोणासाठी चालले आहे? इथली जनता देशातले नागरीक नाही का? भूमीपुत्र नाही का?, असा प्रश्न विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

ते म्हणाले की, सातत्याने आपल्या भूमीच्या रक्षणासाठी आंदोलनाच्या भूमिकेत उतरणाऱ्या स्थानिक नागरिकांचा आवाज पोलिसांच्या बळावर दाबून टाकायचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्याच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण करायचे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये रिफायनरीचा प्रोजेक्ट रेटून न्यायचा अशापद्धतीची दमनशाही शिंदे सरकार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांतर्फे आणि उद्योगमंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या खात्यामार्फत सुरू झालेली आहे. अशापद्धतीची पोलिसांची दमनशाही यापूर्वी आम्ही कोकणामध्ये कधी पाहिली नव्हती. प्रथमच एवढ्या संस्खेने आणि सर्व शस्त्रानिशी पोलीस फौजफाटा येथे तैनात करण्यात आलेला आहे. स्थानिक जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण करून रिफायनरीचा प्रोजेक्ट पुढे रेटायचे ठरवले आहे, हे अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.

या रिफायनरीला विरोध करत असताना रिफायनरीच्या विरोधकांच्या संघटनांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सातत्याने निवेदन दिले आहे. आमचे म्हणणे ऐकून घ्या म्हणून सांगितले, पण तिघांनी त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे. आज पोलीस फौजफाट्यामार्फत त्यांच्यावर जरब बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे, असे विनायक राऊत म्हणाले. त्यांनी सांगितले की, काल वार्ताकन करायला गेलेल्या पत्रकाराच्या मानगुटीला पकडून ज्या पद्धतीने त्याला हद्दपार करण्यात आले, ही लोकशाही नाही आहे. इथे लोकशाहीची अंमलबजावणी होत नाही, तर तानाशाहीचं अंमल होत आहे असे मला वाटते, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -