घरताज्या घडामोडीRelationship Tips : एगेंजमेंट ते लग्नापर्यंतच्या काळातल्या 'या' चुका टाळाच

Relationship Tips : एगेंजमेंट ते लग्नापर्यंतच्या काळातल्या ‘या’ चुका टाळाच

Subscribe

लग्नाचे बंध हे नाजुक असतात कारण जेव्हा एखादा व्यक्ती लग्नबंधनात अडकत असतो तेव्हा त्याच्या समोरील व्यक्ती हे एकमेकांसाठी नवखे असतात. अशा नवख्या माणसाच्या सवयी,आवडी-निवडी जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. कधी-कधी एकमेकांच्या काही गोष्टी पटत नाही. मात्र,या खटकणाऱ्या गोष्टी आपण पटकन बोललो तर समोरच्याचे मनं दुखावून तुमच्या नव्याने फुलणाऱ्या नात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

आपल्या भारतीय संस्कृतीत एकदा मुलगा किंवा मुलगी वयात आले की, त्यांच्या मागे लग्नाचं काय मग? लग्न केव्हा करणार?  असे अनेक प्रश्न परिवारातील सदस्य आणि शेजारी सर्वजण विचारुन भांडावून सोडतात. लग्नाचे बंध हे नाजुक असतात.कारण जेव्हा एखादा व्यक्ती लग्नबंधनात अडकत असतो तेव्हा त्याच्या समोरील व्यक्ती आणि तो हे एकमेकांसाठी नवखे असतात. अशा नवख्या माणसाच्या सवयी,आवडी-निवडी जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. कधी-कधी एकमेकांच्या काही गोष्टी पटत नाही. मात्र,या खटकणाऱ्या गोष्टी आपण पटकन बोललो तर समोरच्याचे मनं दुखावून तुमच्या नव्याने फुलणाऱ्या नात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.त्यामुळे तुमचंही लग्न ठरतंय का? मग, एगेंजमेंट ते लग्नापर्यंतच्या काळात काही चुका करणं टाळाच. यावेळी व्यावहारिक चुका या तुमच्या नात्यावर परिणाम करु शकतात. एवढा परिणाम होतो की लग्नाची गोष्ट ही गोष्टच राहील. त्यामुळे कोणत्याही नात्यात स्पष्टता असावी मात्र,साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंत काही गोष्टाचा संयम राखला पाहीजे.

हुकुम गाजवणारी भाषा टाळावी.

बऱ्याचदा असे निदर्शनास येते की, लग्नानंतर मुलं आपल्या सहचारीणीला हुकुम द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे त्याचा परिणाम हा लग्नबंधनावर होतो. किंबहुना स्वत:ची मतं समोरच्यावर लादण्याने एकमेकांवरील प्रेम कमी होऊ शकते.त्यामुळे अनेकदा लग्नबंधनात अडकल्यामुळे मजबुरी उरते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपले नाते अधिक फुलवण्यासाठी समोरील व्यक्तीला तिच्या आयुष्यात स्वत:ची स्पेस देणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्ट दमदाटी न करता सुसंवादाने केली असता, नात्याचा गोडवा आणखी वाढेल. त्यामुळे नात्यात कधीही एकमेकांवर वर्चस्व गाजवू नये. या गोष्टींची नाते टिकवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

फ्लर्टिंग करणे सोडून द्या

अनेकदा काही लोकांना फ्लर्ट करण्याची प्रचंड सवय असते. मात्र, तुमच्यातील हीच गोष्ट तुमच्या जोडीदाराला खटकू शकते. याशिवाय तुम्ही तुमच्या पार्टनरच्या नजरेतून उतरु शकता. त्यामुळे समोरील व्यक्ती कायमची तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. त्यामुळे फ्लर्ट करण्याची सवय मोडून टाका नाहीतर, तुमच्या नव्याने फुलणाऱ्या नात्यावर त्याचा परिणाम दिसून येईल.

एकमेकांचा आदर करा

हे सर्व सोडून एकमेकांचा आदर करा. म्हणजेच एकमेकांच्या भावनांकडे लक्ष द्यायला शिका. तुमच्या कोणत्याही वर्तनामुळे तुमच्या जोडीदाराचा स्वाभिमान दुखावला जाईल असे करु नका. या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमचे नाते घट्ट करू शकाल.

- Advertisement -

हेही वाचा – Virat kohli : दक्षिण आफ्रिका विरोधातील पराभवानंतर विराट कर्णधार पद सोडणार हे अपेक्षित होत, सुनील गावस्करांचा गौप्यस्फोट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -