घरताज्या घडामोडीपुरी गोल गरगरीत फुगण्यासाठी 'या' टिप्स वापरा

पुरी गोल गरगरीत फुगण्यासाठी ‘या’ टिप्स वापरा

Subscribe

पुरी हा असा पदार्थ आहे की तो सणाव्यतिरिक्तही घराघरात बनवला जातो. त्यातही गोल गरगरीत पुरी खाण्याची मज्जा वेगळीच असते. पण बऱ्याचवेळा बरीच मेहनत करून बनवलेल्या पुऱ्या फुगत तर नाहीत शिवाय त्या काही वेळातच वातडही लागतात. पण खालील टिप्स वापरून तुम्ही सगळ्यांना आवडतील अशा पुऱ्या बनवू शकता.

पुरीच्या पीठात तेल किंवा तूपाचे मोहन घालावे. मीठ टाकून चांगले मळून घ्यावे.

- Advertisement -

पीठ कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवावे.

पुऱ्यांसाठी पीठ मळताना ते खूप कडक किंवा सैल मळू नये. तर मध्यम मळावे.

- Advertisement -

पुऱ्या लाटल्यानंतर एकमेकांवर ठेवू नये. नाहीतर त्या चिटकतात.

लाटलेल्या पुऱ्या एका पसरट ताटात किंवा कागदावर अंतराने ठेवाव्यात. १० ते १५ मिनिटांतच त्या तळून घ्याव्या.

पुरी तळताना तेल कडकडीत गरम असावे. नाहीतर पुऱ्या फुगत नाहीत.

पुरी लाटताना सुके पीठ त्याला लावू नये त्याऐवजी तेल लावून लाटाव्यात. तरच पुऱ्या फुगतात.

पुरी तळताना झाऱ्याने हलकी दाबावी म्हणजे ती फुगते.

जर गरम गरम पुऱ्या वाढायच्या असतील तर मंद आचेवर तळाव्यात.

जर जेवणासाठी वेळ लागणार असेल तर पुऱ्या कडक तेलात तळून घ्याव्यात. बराच वेळ नरम राहतात आणि त्यांचा फुगीरपणाही टीकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -