घरलाईफस्टाईललिपस्टिकची निवड करताना

लिपस्टिकची निवड करताना

Subscribe

हल्ली वेगवेगळ्या कंपन्यांनी लिपस्टिक, लिपकलर्स बाजारात आणले आहेत. कोणी थ्रीडी लिपस्टिक तर कोणी एचडी, कोणी ग्लॉसी तर कोणी मॅट लिपस्टिक.पण ब-याचदा असं होतं की या लिपस्टिक आपल्यावर उठून दिसत नाही. त्यामुळे डस्की स्कीनटोन असणा-या भारतीय महिलांनी लिपस्टिक निवडताना काही गोष्टी पाहाव्यात.

हजारो रंगांच्या, शेकडो प्रकारच्या लिपस्टिक बाजारात मिळतात. हल्ली काही ब्रँड तर दर तीन एक महिन्यांनी लिपस्टिक लिपकलर्सच्या वेगवेगळ्या रेंज लाँच करत असतात. ब-याच महिलांना लिपस्टिक लावणं आवडतं. बाजारात एखादा नवीन शेड आला की तो विकत घेणारा मोठा महिलावर्ग आहे. या लिपस्टिक लिपकलर्सचे चमकदार रंग आकर्षक पॅकेजिंग अनेकींना भुरळ पाडतात.

- Advertisement -

काही महिला सुंदर पॅकिंगलाच आकर्शित होऊन किंमत न पाहताच त्या विकत घेतात; पण नंतर असं लक्षात येतं की हे रंग आपल्या ओठांवर अजिबात उठून दिसत नाही. याच एक कारण म्हणजे लिपस्टिकचे अनेक ब्रँड हे परदेशातले असतात. त्यामुळे ते तिथल्या महिलांच्या गो-या रंगाचा विचार करून त्यांच्या चेह-याला साजेशा अशा लिपस्टिक तयार करतात. ते रंग इथल्या सावळ्या रंगावर अजिबात खुलून दिसत नाही. म्हणूनच हल्ली काही कंपन्यांनी खास भारतीय माहिलांसाठी लिपस्टिक तयार केल्या आहेत.

lipstick1

- Advertisement -

भारतीय महिलांना लिपस्टिक विकत घेताना त्या डस्की स्कीनटोनसाठी आहेत का हे पाहून मगच त्या विकत घ्या किंवा अशा ब्रँडना प्राधान्य द्या जे खास करून भारतीय महिलांसाठी लिपस्टिक तयार करतात. असं केल्यामुळे लिपस्टिक निवडताना तुम्हाला असा रंग मिळेल जो तुमच्या चेह-यावर आणि ओठांवर खुलून दिसेल.

अनेक जणी लिपस्टिकचा रंग निवडताना ती लिपस्टिक हाताच्या मागच्या बाजूला लावतात आणि हा रंग आपल्यावर चांगला दिसेल की नाही हे ठरवतात. पण असं करणं चुकीचं आहे. रंग निवडताना तो बोटांवर लावून पाहावा, कारण हाताच्या बोटांचा रंग आणि ओठांचा रंग किंचित मिळता जुळता असतो.

भारतिय महिलांनी लिपस्टिक विकत घेताना शक्यतोवर आपल्या रंगापेक्षा दोन शेड्स गडद निवडाव्यात. भारतीय महिलांचा स्कीनटोन हा डस्की आहे, त्यामुळे लिपस्टिक निवडताना कॉपर, ब्राँझ, ब्राऊन बेरी अशा शेड्सना प्राधान्य द्यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -