घरमुंबईमहाआघाडीत मनसेला घेण्यास राष्ट्रवादी आग्रही

महाआघाडीत मनसेला घेण्यास राष्ट्रवादी आग्रही

Subscribe

कोट्यातील जागा सोडण्याची तयारी

२०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस आघाडीत मनसेला स्थान देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला साजेशी तयारी काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे. राष्ट्रवादी आपल्या कोट्यातील जागा मनसेला तर काँग्रेस आपल्या कोट्यातील जागा प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी पक्षाला यांना देण्याची चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजप विरोधातील मतांचे विभाजन करायचे नाही, असा निर्णय या दोन्ही पक्षांनी घेतला आहे. यातूनच कोट्यातील जागांचे वाटप करण्याचे सूत्र पुढे आले आहे.

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युलयावरुन दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या चर्चांच्या फेर्‍या सुरू झाल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडी व्हावी यासाठी काँग्रेस श्रेष्ठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यात एकमत झाले आहे. पण आघाडीत मनसेला घेण्याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम आहे. उत्तर भारतीयांच्या मतांमध्ये खोडा निर्माण होण्याची भीती त्या पक्षाला आहे. तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या जनाधाराचा फायदा आघाडीला होऊ शकतो, असा दावा राष्ट्रवादी करत आहे.

- Advertisement -

आमचा पक्ष राज ठाकरे यांच्यासाठी आग्रही आहे, असे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘महानगर’शी बोलताना केले. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी अजिबात जमत नाही. पण काँग्रेस पक्षाला आंबेडकर यांच्या ताकदीचा फायदा हवा आहे. यातूनच आपापल्या कोट्यातील जागांची वाटणी करण्याला दोन्ही पक्षांनी संमती दिल्याचे सांगतात.

आघाडीतल्या दोन्ही काँग्रेस पक्ष प्रत्येकी २४ जागांवर समेट करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस आपल्यातील जागांचा वाटा भारिप बहुजन महासंघ आणि स्वाभीमानी पक्षाला तर राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि शेकापला बरोबर घेत त्या पक्षाला जागा सोडतील, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. यातील एखाद्या पक्षाने अधिक जागांचा आग्रह धरला तर त्यांना येणार्‍या विधानसभेवेळी अधिक जागा देण्याची तयारीही या दोन पक्षांकडून केली जाऊ शकते, असे काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘महानगर’शी बोलताना स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -