घरमुंबईशिवसेनेचे 24 तास पाण्याचे स्वप्न भंगले

शिवसेनेचे 24 तास पाण्याचे स्वप्न भंगले

Subscribe

नगरसेविकेच्या घरातच पाणी गायब

मुंबई: मुंबईकर नागरिकांना निवडणुकीपूर्वी दिवस-रात्र 24 तास आवड्यातील सातही दिवस पाणी देण्याचे आश्वासन शिवसेनेचे दिले होते. पालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी अद्याप हे आश्वासन शिवसेनेला पूर्ण करता आले नसल्याने शिवसेनेच्याच नगरसेवकांनी स्थायी समितीत तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईत 27 टक्के पाणी गळती, पाणी चोरी होते. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणीटंचाई आहे, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण आहेत. त्यामुळे छुप्या पद्धतीने पाणी कपात केली जात आहे का,असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला.

पालिकेच्या हद्दीतील झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या एक किंवा दोन झोपडीधारकांनी नवीन जलजोडणीची मागणी केल्यास नियमानुसार पुराव्यांची पडताळणी करून शुल्क आकारून जलजोडणी देण्यात यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. या प्रस्तावावर बोलताना जोगेश्वरी येथे 25 व 26 सप्टेंबर रोजी पाणी आले नाही, पाण्याचे प्रमाणही कमी असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. जल विभाग काम करण्यासाठी सक्षम नसल्याची टिका करत 24 तास पाणी कसे देणार, असा प्रश्न शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी केला. सांताक्रूझ येथे पाणी कपात असल्याची तक्रार शिवसेनेचे नगरसेवक सदा परब यांनी केली. तर कुलाबा विभागात दोन महिने योग्य प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. याबाबत सतत तक्रार करूनही प्रशासन पाणी पुरवठा योग्य असल्याचे उत्तर देत आहेत, हे चुकीचे असून माझ्याच घरात पाणी येत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता सानप यांनी केली.

- Advertisement -

समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी वांद्रे विभागात सुरु असलेल्या पाणी पुरवठाबाबतच्या पायलट प्रकल्पाचा आढावा घ्यावा, तसेच प्रकल्प चालवणार्‍या कंपनीचे वांद्रे कार्यालय पालिकेने ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली. काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांनी या प्रकल्पावर 300 कोटी रुपये वाया जात असल्याचे सांगितले. भाजपच्या राजश्री शिरवडकर यांनीही सायन विभागात सोसायट्यांमधून पाणी येत नसल्याने टँकर मागवावे लागत असल्याचे सांगितले. भाजपचे अभिजित सामंत यांनीही पाणी येत नसल्याने बांधकाम आणि स्विमिंगपुलचे पाणी थांबवावे, अशी मागणी केली.

नगरसेविकेच्या घरी पाणी न आल्याने खुलासा करणार

स्थायी समिती अध्यक्षांनी शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता सानप यांच्या घरी पाणी येत नसल्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने याबाबत खुलासा करावा, अशी सूचना केली. कुलाबा विभागात पाणी पुरवठा कमी होत असल्याने क्रॅास कनेक्शनचे काम हाती घेतले जाणार असून ही तक्रार लवकरच दूर केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -