घरमहा @२८८आंबेगाव विधानसभा मतदारसंघ- म. क्र. १९६

आंबेगाव विधानसभा मतदारसंघ- म. क्र. १९६

Subscribe

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव हा (विधानसभा क्र. १९६) विधानसभा मतदारसंघ आहे.

१९६ क्रमांकाचा आंबेगाव मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील शिरूर या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३०९ मतदान केंद्र आहेत. संपूर्ण जिल्ह्याचं आंबेगाव विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष लागले असते. याचं कारण या मतदारसंघात सलग सहा वेळेस आमदार राहिलेले दिलीप वळसे-पाटील आता सातव्यांदा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. आतापर्यंत दिलीप वळसे पाटील यांचा या मतदारसंघात पराभव झालेले नाही. वळसे पाटील आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे हे होम पिच आहे. दोघेही एकाच तालुक्यातील आहेत. तर या मतदारसंघावर वळसे पाटील यांचे वर्चस्व आहे.

मतदारसंघ क्रमांक – १९६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,४१,१९७

- Advertisement -

महिला – १,२८,९३६

एकूण मतदार – २,७०,१३३


विद्यमान आमदार – दिलीप वळसे-पाटील

दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार असून २०१४ साली १,२०,२३५ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे अरूण गिरे हे आमने-सामने उभे होते. राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वळसे-पाटील यांनी १,२०,२३५ एवढी मते घेत विजय मिळवला. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनाचे अरूण गिरे होते. त्यांना ६२, ०८१ मते मिळाली आणि त्यांचा ५८,१५४ मतांनी पराभव झाला. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर भाजपचे जयसिंग एरंडे, चौथ्या स्थानावर काँग्रेसचे श्रीमती संध्या बानखेले आणि पाचव्या क्रमांकावर विजय आढारी हे अपक्ष म्हणून निवडणून आले.

उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरवात केली. राज्यभर फिरून त्यांनी महाराष्ट्र जाणून घेतला. १९९० साली आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – १,२०,२३५
  • अरूण गिरे, शिवसेना – ६२, ०८१
  • जयसिंग एरंडे, भारतीय जनता पक्ष – ४,६१५
  • श्रीमती संध्या बानखेले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – २,४०८
  • विजय आढारी, अपक्ष – १,२०५

नोटा – १,२९७

मतदानाची टक्केवारी – ७१.७६%


हेही वाचा –  शिरुर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -