घरमुंबईडोंबिवली खाडीकिनारी पुराचा फटका; शेकडो कुटुंबांचा संसार उघड्यावर!

डोंबिवली खाडीकिनारी पुराचा फटका; शेकडो कुटुंबांचा संसार उघड्यावर!

Subscribe

डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाचा सर्वाधिक फटका खाडीकिनारी असलेल्या अनधिकृत झोपड्यांना बसत आहे. शेकडो संसार उघड्यावर आले प्रशासकीय मदतीच्या अपेक्षेवर ही सर्व कुटुंबं आहेत.

मुसळधार पावसामुळे सर्वाधिक पुराचा फटका डोंबिवली खाडीकिनारी असलेल्या शेकडो रहिवाशांना बसला आहे. बैठ्या चाळी पाण्याखाली गेल्याने त्यांच्या घरातील सर्वच वस्तू, भांडी-कुंडी वाहून गेली आहेत. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या आहेत. इथल्या शेकडो कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला आहे. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने आता जगायचे कसे? असाच सवाल रहिवासी विचरत आहेत. त्यामुळे शासनाकडून मदत मिळावी अशीच त्यांची मागणी आहे. या पावसाचा फटका कल्याण डोंबिवली शहरातील सखल भागामध्ये राहणाऱ्या नागरीकांना बसला आहे. डोंबिवली खाडी किनारी शेकडो बैठ्या चाळी आहेत. या ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवल्याने ही घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. अंगावरील कापड्यांनिशी लोकं घराबाहेर पडली.

पुन्हा शून्यापासून सुरुवात…!

दरम्यान, कल्याण पश्चिम येथील रेतीबंदर परिसरात तब्बल एक ते दीड हजार नागरीक बाधित झालेले आहेत. कल्याण पूर्वेतील वालधुनी नदीच्या बाजूला राहणारे दीड हजार लोक बाधित झालेले आाहे. सगळ्यात भयनाक परिस्थिती डोंबिवलीतील नवीन देवीचा पाडा या परिसरात आहे. या परिसरात लोकांच्या घरात पाणी भरले होते. लोकांनी कसा बसा पूरातून आपला जीव वाचविला. घरातील सर्व वस्तू, अन्नधान्य पावसाच्या पाण्याने नुकसान झाले आहे. तीन ते चार दिवसांपासून लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. लोकांकडे कपडे किंवा अन्न, पाणी नाही. एकाच कपड्यावर ते आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा संसार पुन्हा थाटण्यासाठी पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोल्हापूर, सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

चाळ माफियांचा भ्रष्टाचार

लोकप्रतिनिधी आणि महापालिकेने या सर्व नागरिकांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांची विचारपूस कोणीही केलेली नाही. त्यांच्याकडे कोणी आले नाही असा आरोप रहिवाशांनी केला. हा परिसर खाडी किनारी भागात आहे. त्यामुळे ही घरे अनधिकृत ठरविली जातात. मात्र ज्यावेळी ही घरे बांधली जात होती त्यावेळी महापालिका प्रशासन झोपा काढत होतं का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. बेकायदा चाळ माफिया महापालिका अधिकाऱ्यांना पैसा पुरवून स्वस्त दरात ही घरे नागरीकांना विकली जातात. पावसाच्या पाण्यात भिजलेल्या सर्व वस्तू नागरीकांनी रस्त्यावर टाकल्या आहेत. या ठिकाणी रोगराई पसरण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे शासन, महापालिका प्रशासन इकडे कधी लक्ष देईल असा संतप्त सवाल नागरीकांकडून केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -