घरमहा @२८८वडाळा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १८०

वडाळा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८०

Subscribe

वडाळा (विधानसभा क्र. १८०) हा मुंबई शहरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

मुंबईच्या ७ बेटांपैकी वडाळा हे एक बेट होतं. अखंड मुंबई करताना हे बेटदेखील मुंबई शहरमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं. त्यातल्याच दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातला वडाळा हा एक विधानसभा मतदारसंघ. इथल्या मतदारांनी काँग्रेसला नेहमीच झुकतं माप दिलं आहे. या मतदारसंघात एकूण २२४ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १८०

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,०३,८९०
महिला – ९३,०६१

- Advertisement -

एकूण मतदार – १,९६,९५१


kalidas kolambkar
कालीदास कोळंबकर

माजी आमदार – कालीदास कोळंबकर

(निवडणुकीपूर्वी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश. आमदारकीचा राजीनामा दिला)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कालीदास कोळंबकर हे आत्तापर्यंत ७ वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. आधी ते शिवसेनेत होते. २००५मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४मध्ये ते ७व्यांदा विधानसभेवर निवडून गेले. नुकताच त्यांनी निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे २०१९च्या विधानसभा निवडणुका ते भाजपच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी राज्य सरकारमध्ये विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) कालीदास कोळंबकर, काँग्रेस – ३८,५४०
२) मिहील कोटेचा, भाजप – ३७,७४०
३) हेमंत डोके, शिवसेना – ३२,०८०
४) आनंद प्रभू, मनसे – ६२२३
५) नोटा – १६२४

मतदानाची टक्केवारी – ६१.३९ %


हेही वाचा – मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -