घरमहाराष्ट्रपलाव्यातील श्वानांचं रेबीज प्रतिबंध लसीकरण

पलाव्यातील श्वानांचं रेबीज प्रतिबंध लसीकरण

Subscribe

'पॉज' संस्थेतर्फे १३६ श्वानांचं लसीकरण, सरकारच्या मोहिमेला संस्थांचा पुढाकार

मुंबईतील प्राण्यांपासून पसरणाऱ्या रेबीज या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी पालिकेनंतर अनेक वेगवेगळ्या संस्था ही पुढाकार घेत आहेत. पॉज या संस्थेतर्फे रेबीज प्रतिबंध लसीकरणासाठी मोहिम राबवली गेली. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमाप्रमाणे भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आवश्यक आहे आणि त्यांना रेबीज प्रतिबंधक लस दरवर्षी देणे गरजेचं आहे. यासाठी ‘पॉज’ संस्थेने पुढाकार घेत २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी मुंबईच्या उपनगरातील पलावा सीटीतील श्वानांचं रेबीज लसीकरण केलं.

संस्थेच्या प्रशिक्षित कार्यकर्ते आणि पशुवैद्यकांनी पलावा येथील जवळपास १३६ हून अधिक भटक्या कुत्र्यांना आणि पिल्लांना रेबीज प्रतिबंधक लस दिली. यात जवळपास १६ जणांच्या टीमने भाग घेऊन पलावा मधील क्यासा रिओ, क्यासा रिओ गोल्ड, गोल्फ लिंक्स, लेक शोर ग्रीन, ह्या भागात फिरून लसीकरण केले.

- Advertisement -

पॉज संस्था गेली २० वर्षे ही सेवा देत असून आता पर्यंत संस्थेने ४० हजारांहून अधिक प्राण्यांना लस टोचली आहे. तसचं, गाडीच्या अपघातात प्राण्यांचा मृत्यू टाळता यावा यासाठी श्वानानां रेफ्लक्टिव्ह कॉलर घालण्यात आली, ही कॉलर गाडी किंवा दुचाकी वाहनाच्या प्रकाशात चमकते. ज्यामुळे प्राणी आणि मनुष्य यातील रात्री होणारे अपघात टळतात. भरधाव वेगाने चालणाऱ्या गाड्यांच्या धडकेत अनेकदा प्राण्यांना जीव गमवावा लागतो. यासाठी ही कॉलर खूप महत्त्वाची असल्याचं मत प्लांट अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या निलेश भणगे यांनी व्यक्त केलं आहे.

काय आहे रेबीज?

रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी, जसे की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगात रोगी पाण्याला घाबरतो. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र, रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे.

- Advertisement -

रेबीजची लक्षणे –

कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसांत दिसू लागतात. साधारणपणे २ ते १२ आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी रोग्यात लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो आणि जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -