घरमहाराष्ट्रमुंबईत भाजपाला खिंडार! १०० महिलांनी केला शिंदे गटात प्रवेश, आमदार प्रकाश सुर्वेंच्या...

मुंबईत भाजपाला खिंडार! १०० महिलांनी केला शिंदे गटात प्रवेश, आमदार प्रकाश सुर्वेंच्या प्रयत्नांना यश

Subscribe

मुंबई – शिवसेनेत अंतर्गत बंडाळी करून नवा गट स्थापन करणाऱ्या शिंदे गटाने आता भाजपामध्येही फोडाफोडी केली आहे. भाजपच्या तब्बल १०० महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक २५ च्या भाजपच्या वॉर्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासह १०० महिला प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. (100 of Women from BJP entered in the Shinde Group)

हेही वाचा – शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; ‘या’ तारखेचा मुहूर्त?

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. अनेकांनी पक्षबांधणी सुरू केली असल्याने आता निवडणुकीला रंगत येणार आहे. त्यातच, शिवसेनेसोबत बंडाळी करून एकनाथ शिंदे यांनी ज्यांच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली अशा भाजपामध्येच त्यांनी खिंडार पाडले आहे. भाजपच्या १०० महिलांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गट आणि भाजपा यांच्यात अंतर्गत वाद होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – दसरा मेळावा! दोन्ही गटांत शिवतीर्थासाठी चुरस; शिवाजी पार्क कोण गाजवणार?

- Advertisement -

शिवसेनेत बंडाळी झाली तेव्हा शिवसेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांना फोडण्यात आमदार प्रकाश सुर्वे यांना यश आले होते. आता भाजपाच्या वॉर्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांनाही आपल्या गटात सामील करून घेण्यात प्रकाश सुर्वे यशस्वी ठरले आहेत. प्रीती इंगळे शिंदे गटात आल्याने त्यांच्यासोबत १०० महिलांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आमदार प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात. त्याआधी ते उद्धव ठाकरे यांच्याही जवळ होते. विशेष अधिवेशनात आदित्य ठाकरे यांनी प्रकाश सुर्वे यांच्याशी सभागृहाच्या परिसरात संवादही साधला होता. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं तेव्हा आदित्य ठाकरे यांनी प्रकाश सुर्वेंना म्हटलं होतं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -