घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र"१५ वर्षीय मुलगी गर्भवती"; १९ वर्षीय प्रियकर झाला फरार

“१५ वर्षीय मुलगी गर्भवती”; १९ वर्षीय प्रियकर झाला फरार

Subscribe

नाशिक : सोशल मीडियाचा अतिवापर, पालकांचे दुर्लक्ष, चित्रपटातील प्रणयदृश्य व प्रेमकथांचा मुलामुलींवर विपरीत परिणाम होत असल्याने अल्पवयीन मुली अत्याचाराला बळी पडत आहेत. तअशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईनाका परिसरातील १९ वर्षीय मुलाने १५ वर्षाच्या मुलीला विवाह करण्याचे आमिष दाखवत तिच्यासोबत वारंवार शारीरीक संबध ठेवले. त्यातून ती पाच महिन्यांची गर्भवती राहिली आहे. विशेष म्हणजे, मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रियकराने लग्न करण्यास नकार देत पळून गेला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित विवेक भाऊसाहेब निकम (वय १९, रा. शिवाजी वाडी) याच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी व संशयित मुलगा एकमेकांच्या ओळखीचे आहेत. संशयित विवेकने तिच्याशी ओळख वाढवली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पीडित मुलगी 10 वर्षाची तर संशयित हा 14 वर्षाचा असल्यापासून प्रेमसंबध होते. संशयिताने मुलीला आपण कोर्ट मॅरेज करु, असे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने तिच्यावर वेळोवेळी शारीरीक संबध ठेवले. या संबधातून मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहली.

- Advertisement -

मुलगी गर्भवती राहिल्याचे समजल्यानंतर संशयिताने लग्न करण्यास नकार देत पळून गेला. ही बाब मुलीच्या कुटुंबियांना समजली असता त्यांना धक्काच बसला. तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नथ्थु सोनवणे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -