घरमहाराष्ट्रधक्कादायक! सिंधुदुर्गात एकाच दिवसात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू तर २३७ पॉझिटिव्ह

धक्कादायक! सिंधुदुर्गात एकाच दिवसात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू तर २३७ पॉझिटिव्ह

Subscribe

१६ ते २२ एप्रिलदरम्यान जिल्ह्यात तब्बल ४८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असून परिस्थिती दिवसागणिक चिंताजनक होत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत सतत मोठी वाढ होत असल्याने मृतांचा धडकी भरवणारा आकडा समोर येत आहे. गुरुवारी जिल्ह्यात २३७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तब्बल १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एका दिवसात मृत रुग्णांचा हा सर्वाधिक मोठा आकडा होता. त्यामुळे सिंधुदुर्गातील कोरोना परिस्थिती आरोग्य व्यवस्थेच्या नियंत्रणाबाहेर जात आहे.

सिंधुदुर्गात आत्तापर्यंत १० हजार ५२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २४९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ८८९ पोहचली असून यातील १७६ रुग्णांची स्थिती अधिक गंभीर असल्याची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग राज्यालाही बसत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये अपुऱ्या सेवा सुविधांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करताना आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. यात चिंताजनक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

१६ ते २२ एप्रिलदरम्यान जिल्ह्यात तब्बल ४८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान दिवसाला ५ ते ६ कोरोनाबांधितांचा मृत्यू होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी (२३ एप्रिल) ला तब्बल १५ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.यामुळे जिल्ह्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. गुरुवारी ११० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ७ हजार ६१९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान १७६ रुग्णांची स्थिती गंभीर असून यातील १५३ रुग्ण ऑक्सिजनवर असून २३ रुगण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत.

- Advertisement -

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण

देवगड १ हजार ६६, दोडामार्ग ५६७, कणकवली २ हजार ८७०, कुडाळ २ हजार १९२, मालवण १ हजार ९०, सावंतवाडी १ हजार ३८७, वैभववाडी ६७९, वेंगुर्ला ८४५, जिल्ह्याबाहेरील ६७.

२ हजार ८८९ सक्रिय रुग्ण

जिल्ह्यात २ हजार ८८९ रुग्ण सक्रिय असून यात देवगड ४२५, दोडामा १७१, कणकवली ५५०, कुडाळ ४६१, मालवण ३३४, सावंतवाडी ३२२, वैभववाडी ४०१, वेंगुर्ला १९१, जिल्ह्याबाहेरील ३४.


Corona Vaccination : ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर Pfizer पुरवणार भारताला लस, कंपनीची घोषणा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -