घरताज्या घडामोडीमालाड मालवणीतील दगडफेकप्रकरणी 25 जण पोलिसांच्या ताब्यात

मालाड मालवणीतील दगडफेकप्रकरणी 25 जण पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

मालाड मालवणीतील दगडफेकप्रकरणी पोलिसांनी 25 जणांना ताब्यात घेतले असून, थोड्याच वेळात या सगळ्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मालवणी येथेरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ढोल-ताशे व लाऊड स्पीकर वाजवण्यावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती.

मालाड मालवणीतील दगडफेकप्रकरणी पोलिसांनी 25 जणांना ताब्यात घेतले असून, थोड्याच वेळात या सगळ्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मालवणी येथेरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ढोल-ताशे व लाऊड स्पीकर वाजवण्यावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा मालवणी येथे राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. (25 people in police custody in Malad Malvani stone pelting case)

मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी येथे गुरूवारी दोन गटात राडा झाला होता. त्यानंतर दगडफेकही झाली होती. याप्रकरणी पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. तसेच, याप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. 353, 354, 332, 143, 147, 149 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि ड्रोन फुटेज असून या फुटेजच्या मदतीने संबंधितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

पुन्हा मालवणीमध्ये गोंधळ

मालवणी येथे गुरूवारी रात्रीच्या सुमारास दोन गटात झालेल्या दगडफेकीनंतर आज सकाळी पुन्हा काही जणांनी गोंधळ घातला. या गोंधळानंतर पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. तसेच, ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना सोडवण्यासाठी संबंधितांचे नातेवाईक पोलिसांच्या हातापाया पडत असल्याचे दिसत आहे.


हेही वाचा – संभाजीनगरनंतर मुंबईतही राम नवमीला गालबोट; मालाड मालवणीत शोभायात्रेवर दगडफेक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -